स्वतःच्याच मुलीला मृत जाहीर करण्याची मागणी करत आहेत आईवडील

वॉशिंग्टन : बेपत्ता भारतीय - अमेरिकन विद्यार्थिनी सुदीक्षा कोनांकी हिला मृत जाहीर करावे, अशी मागणी तिच्या आईवडिलांनी रडत रडत केली आहे. सुदीक्षाच्या पालकांनी डोमिनिकन रिपब्लिकच्या अधिकाऱ्यांकडे आपली मागणी नोंदवली आहे.



विद्यार्थिनी सुदीक्षा कोनांकी हिच्या मृत्यूचा तपास एक तपास पथक करत आहे. या पथकाने दिलेल्या अहवालात सुदीक्षाचा बुडून मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हा अहवाल आल्यानंतर सुदीक्षाचे वडील सुब्बारायडू आणि आई श्रीदेवी कोनांकी यांनी पत्र लिहून डोमिनिकन रिपब्लिकच्या अधिकाऱ्यांनी सुदीक्षाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे पत्र द्यावे अशी मागणी केली आहे. अद्याप ही मागणी मान्य झालेली नाही. सुदीक्षा कोनांकी मृत्यू प्रकरणी डोमिनिकन रिपब्लिकच्या पोलिसांचा तपास सुरू आहे.



डोमिनिकन रिपब्लिकमधील पुंता काना समुद्रकिनाऱ्यावरुन ६ मार्च २०२५ रोजी सुदीक्षा कोनांकी बेपत्ता झाली आहे. सुदीक्षा कोनांकी हिला शेवटचं समुद्रात पोहताना बघितले गेले होते. तिथून ती परतली नाही. नंतर कोणाचाही सुदीक्षाशी संपर्क झालेला नाही. यामुळे पाण्यात बुडून सुदीक्षाचा मृत्यू झाल्याची शक्यता तपास पथकाने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन सुदीक्षा कोनांकीचा मृत्यू झाल्याचे जाहीर करावे आणि तिच्या मृत्यूचे प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी तिच्या आईवडिलांनी केली आहे.

डोमिनिकन रिपब्लिकच्या कायद्यानुसार कोणी गुन्ह्याची कबुली दिली अथवा गुन्हा घडल्याचे पुरावे तपास पथकाच्या हाती आले अथवा मृतदेह सापडला तरच मृत्यू जाहीर केला जातो. पण यापैकी काहीच घडले नसल्यामुळे डोमिनिकन रिपब्लिक सुदीक्षा कोनांकीच्या मृत्यूची घोषणा केलेली नाही.
Comments
Add Comment

अमेरिका-व्हेनेझुएला यांच्यातील तणाव वाढला, अमेरिकेचा ड्रग्ज जहाजावर मोठा हल्ला

वॉशिंग्टन: अमेरिकेने व्हेनेझुएलाहून अमेरिकेकडे येत असलेल्या एका संशयित ड्रग्ज जहाजावर पुन्हा एकदा लष्करी

नेपाळमध्ये सुशीला सरकारचा मोठा निर्णय, आंदोलनादरम्यान प्राण गमावलेल्या Gen-Z ला मिळणार शहीदांचा दर्जा

काठमांडू: नेपाळमध्ये सुशीला कार्की सरकार स्थापन झाल्यानंतर देश हळूहळू आता स्थिरस्थावर होत आहे. सोमवारी सुशीला

नेपाळ, फ्रान्सनंतर आता इंग्लंडमध्ये निदर्शन रॅली, लाखो लोकं रस्त्यावर

लंडन: नेपाळ आणि फ्रान्सनंतर आता आंदोलनाचे वारे ब्रिटनच्या रस्त्यावर देखील दिसून आले आहे. सर्वात महत्वाचे

अमेरिका रशियावर कठोर निर्बंध लादणार

नाटोला चीनवर ५० ते १०० टक्के टॅरिफ लादण्याची मागणी वॉशिंग्टन डीसी (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

सुशीला कार्की नेपाळच्या नव्या हंगामी पंतप्रधान

नेपाळची संसद बरखास्त, हंगामी सरकारचे नेतृत्व करणार नवी दिल्ली : नेपाळमध्ये मागील काही दिवसांपासून मोठ्या

‘या’ देशातील ९९ टक्के लोक वापरत नाहीत सोशल मीडिया

इंटरनेट सुविधा अत्यंत मर्यादित नैरोबी : आजकाल प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसतो, ज्यात सोशल मीडियावर लोक