नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग २०२५ (IPL 2025) चा नवा सिझन सुरू व्हायला काही तास शिल्लक राहिले आहेत. त्याआधी नुकतेच सर्व कर्णधारांचे फोटोशूट झाले. यामध्ये सर्व संघाचे कर्णधार या उपस्थित होते. आयपीएलचा १८ वा सिझन सुरू होणार आहे. आयपीएल २०२५ च्या मेगा ऑक्शनमध्ये खेळाडूंवर पैशांचा पाऊस पाडण्यात आला. आयपीएलचा शुभारंभ कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु यांच्यामध्ये रंगणार आहे. त्यामुळे आता १८ व्या सीझनच्या पहिल्या सामन्यावर चाहत्यांच्या नजरा असणार आहेत.
IPL 2025 : IPLआधीच BCCIचा मोठा निर्णय! चेंडूला लाळ किंवा थुंकी लावण्यावरील बंदी उठणार
जगातील या प्रमुख फ्रँचायझी स्पर्धेच्या १८ वर्षांच्या समारोपानिमित्त बीसीसीआय सर्व १३ ठिकाणी विशेष समारंभ आयोजित करणार आहे. आयपीएल २०२५ (IPL 2025) चे सेलिब्रेशन संपूर्ण हंगामात सुरू राहील, प्रत्येक स्टेडियमवरील पहिला सामना आघाडीच्या कलाकारांच्या सादरीकरणासह सांस्कृतिक कार्यक्रमाने सुरू होईल. “आम्हाला स्पर्धेत अधिक रंगत आणायची होती जेणेकरून सर्वत्र उपस्थित प्रेक्षकांना उद्घाटन समारंभाचा आनंद घेता येईल. प्रत्येक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी राष्ट्रीय आणि स्थानिक कलाकारांची एक रांग असण्याची आमची योजना आहे असे सांगण्यात आले.
या कलाकारांचा असणार परफॉर्मन्स
आयपीएल २०२५ मध्ये बॉलीवूड अभिनेत्री दिशा पाटणी इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या उद्घाटन सोहळ्यात उपस्थित असणार आहे. त्याचबरोबर भारतीय स्टार गायक श्रेया घोषाल तिच्या गायनाने प्रेक्षकांची मन तर जिंकली आहेतच आता ती आयपीएलची मेहफील लुटायला येणार आहे. पंजाबी प्रसिद्ध गायक करण औजला सुद्धा आयपीएलच्या या उद्घाटन सोहळ्यात परफॉर्मन्स करण्यासाठी पाहायला मिळणार आहे. सामन्यापूर्वीच्या ३५ मिनिटांचा भव्य उद्घाटन समारंभ होईल ज्यामध्ये प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल आणि अभिनेत्री दिशा पटानी सादरीकरण करण्याची शक्यता आहे. आयसीसीचे अध्यक्ष जय शहा आणि इतर मान्यवर देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन समारंभाबद्दल माहिती देण्यास नकार देताना स्नेहाशिष म्हणाले, “हा एक मोठा सामना आहे ज्यासाठी तिकिटांची मागणी खूप जास्त आहे. बऱ्याच काळानंतर ईडन गार्डन्सवर उद्घाटन समारंभ होत आहे.”