
मुंबई : पश्चिम रेल्वेतर्फे मुंबई सेंट्रल आणि अहमदाबाद धावणाऱ्या गांधीनगर राजधानी - मुंबई सेंट्रल वंदे भारत एक्स्प्रेसच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. गाडी क्रमांक २०९०१/२०९०२ मुंबई सेंट्रल - गांधीनगर कॅपिटल वंदे भारत एक्स्प्रेसला २३ मार्चपासून प्रायोगिक तत्वावर आणंद स्टेशनवर अतिरिक्त थांबा देण्यात आला. आणंद स्थानकावर अतिरिक्त थांबा दिल्याने मुंबई सेंट्रल आणि अहमदाबाद स्थानकांवरील गाडी वेळेत बदल करण्यात येणार आहे.

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष माहिती. आता समृद्धीवरील प्रवास १९ टक्क्यांनी महागणार आहे. १ एप्रिलपासून ही ...
रविवार २३ मार्चपासून मुंबई सेंट्रल - गांधीनगर कॅपिटल वंदे भारत एक्स्प्रेस सकाळी १०.३८ वाजता आणंद स्थानकावर पोहोचेल आणि सकाळी १०.४० वाजता निघेल. इतर स्थानकांवर वेळेत कोणताही बदल होणार नाही. परतीच्या दिशेने, गांधीनगर राजधानी - मुंबई सेंट्रल वंदे भारत एक्स्प्रेस आणंद स्थानकावर दुपारी ३.३० वाजता पोहोचेल आणि ३.३२ वाजता निघेल. अतिरिक्त थांब्यामुळे, अहमदाबाद स्थानकावरील गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. ही गाडी आता अहमदाबाद स्थानकावर दुपारी २.५०/३.०० ऐवजी २.४५/२.५५ वाजता पोहोचेल/प्रस्थान करेल. तसेच, ही गाडी मुंबई सेंट्रल स्थानकावर रात्री ८.२५ ऐवजी ८.३० वाजता पोहोचेल.