मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष माहिती. आता समृद्धीवरील प्रवास १९ टक्क्यांनी महागणार आहे. १ एप्रिलपासून ही टोलदरवाढ लागू केली जाणार आहे. त्यामुळे आता वाहन चालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
Mumbai Metro : कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो, १४ मार्गिका मार्गी लागणार
मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्ग सुरू झाल्यानंतर मुंबई ते नागपूरपर्यंत प्रवास करण्यासाठी कार चालकांना १४४५ रुपये तर नागपूर ते इगतपुरी प्रवासासाठी १२९० रुपये टोल द्यावा लागणार आहे. नागपूर ते मुंबई या ७०१ किमी अंतरापैकी नागपूर ते इगतपुरी हा ६२५ किमीचा मार्ग सुरू झाला आहे. तर येत्या महिनाभरात इगतपुरी ते आमने हा उर्वरित ७६ किमीचा मार्गही सेवेत दाखल होणार आहे. मात्र हा संपूर्ण महामार्ग खुला होण्यापूर्वीच ‘एमएसआरडीसी’ने त्याच्या टोलमध्ये मोठी वाढ केली आहे
समृद्धी महामार्ग सुरू झाला तेव्हा डिसेंबर २०२२ मध्ये टोल जर जाहीर करण्यात आला होता तेव्हा कार व हलक्या वाहनांसाठी प्रतिकिलोमीटर १.७३ रुपये टोल आकारला जात होता. मात्र आता टोलमध्ये वाढ करण्यात आली असून १ एप्रिलपासून नवे टोलदर लागू होणार आहेत. ३१ मार्च २०२८ पर्यंत म्हणजेच तीन वर्षांसाठी हे नवे दर लागू असणार आहेत, अशी माहिती एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान एमएसआरडीसीच्या या निर्णयाने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे.