मुंबई: भारतीय संघाचा स्टार स्पिनर युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांचा घटस्फोट झाला आहे. दोघांच्या घटस्फोटाच्या निर्णय २० मार्चला मुंबईच्या वांद्रे येथील हायकोर्टात देण्यात आला. वकिलांनी सांगितले की घटस्फोट झाला आहे, दोघांचे लग्न तुटले आहे.
दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचे लग्न २२ डिसेंबर २०२०मध्ये झाले होते. वांद्रे हायकोर्टादरम्यान चहल जो टीशर्ट घालून आला होता त्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
चहलच्या टीशर्टवर ‘Be your own sugar daddy’ असे लिहिले होते. याचे फोटोज आणि व्हिडिओ अनेकांनी शेअर केले. ‘Be your own sugar daddy’हे असे वाक्य आहे ज्याचा वापर अनेकदा अशा व्यक्तीसाठी केला जातो जी आर्थिक मदतीसाठी अथवा गिफ्टसाठी एखाद्यावर अवलंबून राहण्याऐवजी आर्थिकपणे स्वतंत्र असेल.
It’s usual for a ♟️ player to make ❄️ cold move
Our Ex Rcbian #YuzvendraChahal woke up nd decided to wear these
T-shirt which speaks thousand words
This is the most passive-aggressive T-shirt in #divorce history.@venom1s am i ryt #KKRvRCB#IPL2025
pic.twitter.com/UCitpYkQ8e— Vaidesh_R (@vaideshtweetz) March 20, 2025
सोशल मीडयावर अनेक युजर्सना असे वाटते की चहलने हे टीशर्ट धनश्रीला चिडवण्यासाठी घातले होते. चहल आणि धनश्रीने २०२०मध्ये लग्न केले होते आणि जून २०२२पासून ते वेगळे राहत होते. या जोडीने ५ फेब्रुवारीला आपापसातील संमतीने घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती.