मुंबई : क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटावर मुंबईतील न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. न्यायालयाच्या निर्णयानुसार कोट्यवधी रुपयांची पोटगी देऊन युजवेंद्र चहल आता धनश्री वर्मापासून वेगळा झाला आहे.
Disha Salian case : दिशाच्या प्रकरणात वकिलांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, सखोल तपासाची मागणी
घटस्फोटाचा अर्ज केल्यावर सहा महिने विभक्त राहावे लागते. पण क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा हे दोघे मागील दोन वर्षांपासून वेगळे राहत होते. यामुळे सर्व प्रक्रिया पूर्ण करुन न्यायालयाने त्यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब केले. हा निर्णय देऊन घटस्फोटाचे हे प्रकरण संपल्याचे न्यायालयाने जाहीर केले. आयपीएल सुरू होण्याआधीच घटस्फोटाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. यामुळे युजवेंद्र आता खेळण्यावर लक्ष केंद्रीत करू शकेल.
Aaditya Thackeray : दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेला अटक होणार ?
क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा या दोघांनी २०२० मध्ये लग्न केले. लग्नानंतर ते दोन वर्षे एकत्र राहीले. पण या दोन वर्षांनंतर त्यांनी स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून वेगळे राहत आहेत. त्यामुळे न्यायालयात जेव्हा घटस्फोटाचे कारण विचारण्यात आले तेव्हा, या दोघांनाही एकत्र राहण्यात समस्या असल्याचे सांगितले. एकत्र राहायचे नाही आणि त्यामध्येच दोघांचे भले असल्याचे वाटते, असे दोघांनी न्यायालयाला सांगितले. यानंतर न्यायालयाने घटस्फोटावर शिक्कामोर्तब केले. आता यापुढे युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा हे पती-पत्नी नसतील.
युजवेंद्र चहल सध्या आरजे महावशला डेट करत असल्याची चर्चा आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलच्यावेळी या दोघांचे फोटो व्हायरल झाले होते.