Sunday, October 26, 2025
Happy Diwali

भारतीय नागरिकाने खरेदी केला ५० कोटींचा कुत्रा

भारतीय नागरिकाने खरेदी केला ५० कोटींचा कुत्रा
बंगळुरू : कर्नाटकचे आयटी हब असलेल्या बंगळुरू शहरातील एका एस. सतिश यांनी तब्बल ४.४ पौंड मोजून अर्थात ५० कोटी रुपये मोजून वुल्फडॉग प्रजातीचा कुत्रा खरेदी केला.
एस. सतिश हे दुर्मिळ श्वानांच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. एका ब्रोकरच्या माध्यमातून त्यांनी फेब्रुवारी महिन्यात या श्वानाची खरेदी केली होती. कॅडाबॉम्ब ओकामी असे या वुल्फडॉगचे नाव आहे. हा जगातील एक वुल्फडॉग प्रजातीचा एकमेव दुर्मिळ श्वान आहे. तो वुल्फ आणि कॉकेशियन शेफर्ड यांच्या संकरातून जन्माला आला आहे. त्यामुळेच तो जगातला सर्वाधिक महागडा वुल्फडॉग ठरला आहे. त्याचे वय सध्या आठ महिने असून वजन ७५ किलो इतके आहे. तर त्याची उंची ३० इंच इतकी आहे. कॉकेशियन शेफर्ड ही प्रजात त्यांच्या अतुल्य ताकदीसाठी ओळखली जाते. सहसा ही प्रजात जॉर्जिया आणि रशिया अशा थंड प्रदेशात आढळते. लांडगे व इतर वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी प्रामुख्याने या श्वानांचा उपयोग केला जातो.
एस. सतीश हे इंडियन डॉग ब्रीडर्स असोसिएशनचे प्रमुख आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांनी श्वान प्रजनन व्यवसाय सोडला असला तरी आता ते आपल्या दुर्मिळ कुत्र्यांचे प्रदर्शन करून उदरनिर्वाह करतात. त्यात अर्धा तासासाठी दोन लाख ४६ हजार ७०५ रूपयांपासून ते ५ तासांच्या इव्हेंटसाठी १० लाख ९ हजार २५१ रुपये इतकी कमाई ते करतात. सतीश यांनी शेतामध्ये ७ एकरात फार्म हाऊस तयार केले आहे. येथे प्रत्येक कुत्र्यासाठी २० बाय २० फूट आकाराची स्वतंत्र रूम आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी येथे १० फूट उंच भिंती असून हा परिसर २४ बाय ७ सीसीटीव्ही देखरेखीखाली आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >