मुंबई : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रुरकी (IIT-R) ने अभियांत्रिकी पदवीधर अभियोग्यता चाचणी (GATE) चा निकाल जाहीर झाला आहे. रुरकी येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे हा निकाल जाहीर (GATE 2025 result) करण्यात आला आहे. हा निकाल gate2025.iitr.ac.in आणि goaps.iitr.ac.in या अधिकृत वेबसाइटवर जाहीर केला असून उमेदवार आता त्यांच्या लॉगिनचा वापर करून तपासू शकणार आहेत.
परीक्षार्थी विद्यार्थ्यांना GOAPS पोर्टल वेबसाइट – gate2025.iitr.ac.in ला भेट द्यावी लागेल. त्यानंतर नोंदणी आयडी किंवा ईमेल पत्ता आणि पासवर्ड यासारख्या आवश्यक क्रेडेन्शियल्स वापरून लॉग इन करा. त्यानंतर ‘GATE २०२५ निकाल’ टॅबवर क्लिक करा. GATE चा निकाल स्क्रीनवर दिसेल. त्यांना भविष्यातील संदर्भासाठी निकाल डाउनलोड करून सेव्ह करावा लागेल.
दरम्यान, उमेदवारांनी GATE २०२५ चा निकाल डाउनलोड करण्यासाठी लॉगिन क्रेडेन्शियल्स विसरले असतील, तर अधिकृत वेबसाइट – gate2025.iitr.ac.in वर विसरलेले क्रेडेन्शियल्स परत मिळवण्यासाठी एक टॅब आहे. उमेदवारांना त्यांच्या ईमेल आयडीने लॉग इन करावे लागेल आणि नोंदणी आयडी परत मिळवावा लागेल.
२०२५ साठी पात्रताधारक GATE कटऑफ उमेदवाराच्या तपशीलांसह आणि मिळालेल्या गुणांसह प्रदान केला जाईल. स्कोअरकार्डमध्ये परीक्षेच्या प्रत्येक विभागात उमेदवाराने मिळवलेले गुण, एकूण गुण आणि अखिल भारतीय रँक (AIR) यांचा समावेश असेल. अर्जदारांनी लक्षात ठेवावे की स्कोअरकार्ड फक्त कटऑफ स्कोअर पूर्ण करणाऱ्या किंवा त्यापेक्षा जास्त असलेल्यांसाठीच जारी केले जाईल. (GATE 2025 Result)
'शिट्टी वाजली रे' ला टक्कर द्यायला आला नवीन शो मुंबई: सध्या मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका…
मुंबई: अनेकांना आपलं आरोग्य कसं आहे, आणि आपण किती वर्ष जगणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण…
सध्या आयपीएलचा सीझन रंगात आला आहे. संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून क्रिकेटप्रेमी टीव्ही किंवा मोबाईलसमोर ठाण मांडून…
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरसन यांचे मत मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI)…
मुंबई : शिक्षकांसाठी ड्रेसकोड ठरवण्याचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाकडून पुन्हा एकदा विचाराधीन आहे. प्रत्येक जिल्ह्याला…
काही दिवसांपूर्वी २६/११ चा मुंबई दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणा याचं भारतात प्रत्यार्पण झालं. त्यानंतर…