Wednesday, April 23, 2025
Homeक्रीडाआरजे माहवशनेच्या नव्या पोस्टने उडवला धुरळा

आरजे माहवशनेच्या नव्या पोस्टने उडवला धुरळा

मुंबई (प्रतिनिधी): भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहलचा कोरिओग्राफर धनश्री वर्मासोबत नुकताच घटस्फोट दिला. फिरकीपटू चहल आता आरजे माहवश सोबत अनेकदा दिसला आहे. त्यामुळे दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलला दोघेही एकत्र दिसल्याने रिलेशनशीपच्या चर्चांनी वेग घेतला. चहलच्या या कथित गर्लफ्रेंडने सोशल मीडियावर पोस्ट करत चहलची आधीची पत्नी धनश्री वर्मामवर निशाणा साधला असल्याचे म्हटले जात आहे.

मुंबई इंडियन्सला मिळाला नवा कॅप्टन!

घटस्फोटाआधी चहल आणि माहवश या मुंबईतील एका हॉटेलमधून एकत्रित बाहेर पडताना दिसले होते. त्यानंतर चहल मिस्ट्री गर्ल माहवश सोबत ख्रिसमस पार्टीमध्ये दिसला होता. नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल पाहाण्यासाठी चहल व माहवशने एकत्रित हजेरी लावली व सोशल मीडियावर पोस्ट देखील केली. दोघांचे एकत्रित फोटो व्हायरल झाल्यानंतर धनश्रीने इंस्टाग्राम स्टोरी टाकली व तिच्यावर झालेल आरोप खोटे असल्याचे सांगितले. ‘महिलांना दोष देणे, ही फॅशन झाली आहे.’ असे तिन स्टोरिमध्ये लिहीले. तसेच आरजे माहवशने इंस्टा रिल पोस्ट केली आहे. ह्या रिलमधून माहवशने धनश्री वर्मावर निशाणा साधला असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. माहवशने रिलला दिलेले कॅप्शन सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. कॅप्शनमध्ये तिने लिहीले आहे की, ” तू रह दुसरे की खोज में, हम अपनी मौज में|” माहवशचा हा रिल सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Yuzvendra Chahal : चहलला घटस्फोट भारी पडला! आता पोटगी म्हणून द्यावी लागणार ‘एवढी’ रक्कम

युझवेंद्र चहल धनश्रीला देणार ४.७५ कोटींची पोटगी

भारतीय क्रिकेटपटू धनश्रीला घटोस्फोटानंतर किती पोटगी देणार, अशा अनेक चर्चा रंगल्या होत्या. पण कोर्टाने पोटगीची रक्कम ठरवून दिली आहे. कोर्टाच्या आदेशानुसार युझवेंद्र चहल धनश्री वर्माला ४.७५ कोटी रुपयांची पोटगी देणार आहे. ज्यापैकी चहलने २.३७ कोटी रूपये आधीच धनश्रीला दिले आहेत. चहल व धनश्री आर्थिक दृष्ट्या दोघेही स्टेबल आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार चहलची एकूण संपती ४५ कोटी आहे, तर धनश्रीची २४ कोटी आहे. लॉकडाऊन दरम्यान युझवेंद्र आणि धनश्री वर्मा यांची पहिली भेट झाली. धनश्रीने एका रिॲलिटी शोमध्ये सांगितले होते की, चहलने तिच्याशी डान्स शिकण्यासाठी संपर्क साधला होता. यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर नात्याचे रुपांतर प्रेमात झाले. चहल आणि धनश्रीचे डिसेंबर २०२० मध्ये मोठ्या थाटामाटात लग्न झाले. घटस्फोटाआधी १८ महिने दोघेही एकमेकांपासून वेगळे राहत होते. चार वर्षांच्या संसारानंतर अखेर दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. २० फेब्रुवारी २०२५ साली मुंबई कौटुंबिक न्यायालयात दोघांनी घटस्फोट घेतला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -