मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहलबाबत (Yuzvendra Chahal ) अनेक चर्चा सुरु आहेत. युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मासोबतचा (Dhanashree Verma) घटस्फोट प्रकरणामुळे युजवेंद्रच्या चर्चांना उधाण आले आहे. युजवेंद्र आणि धनश्रीच्या घटस्फोटामुळे युजवेंद्र चहलने धनश्रीला तब्बल २.३७ कोटी रुपये दिले होते. मात्र आता चहलला त्याचा घटस्फोट आणखी भारी पडला असल्याचे दिसून येत आहे.
GATE 2025 Result : यंदाच्या GATE परीक्षेचा निकाल जाहीर! ‘असा’ पहा रिझल्ट
युजवेंद्र चहलला मुंबईच्या उच्च न्यायालयाने (Bombay High Court) दणका दिला आहे. मागील दोन महिन्यांपासून चहल आणि धनश्री वर्मा वेगवेगळे राहत आहेत. त्यामुळे त्यांना आता सहा महिने एकत्र राहण्याची गरज नसून चहलने धनश्रीला दिलेली पोटगी पुरेसे नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे आता युजवेंद्र चहलला धनश्री वर्माला पोटगीची दुप्पट किंमत द्यावी लागणार आहे. न्यायालयाने आता चहलला ४.७५ कोटी रुपये धनश्रीला द्यावे लागणार असल्याचे म्हटले आहे.
चहल आणि धनश्रीमध्ये काय घडलं?
चहल आणि धनश्री यांनी २०२० मध्ये लग्न केलं. त्यानंतर दोन वर्षे त्याचं लग्न टिकलं. मात्र जेव्हा युजवेंद्र चहलला भारतीय संघामधूव डच्चू दिला तेव्हा धनश्रीने त्याची साथ सोडली. पण त्यानंतर आयपीएलच्या लिलावात पंजाब किंग्सने त्याला १८ कोटी रुपये देऊन आपल्या ताफ्यात दाखल केले. त्यानंतर चहल (Yuzvendra Chahal) आणि धनश्री यांच्या घटस्फोटाची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली. दरम्यान, या याचिकेवर न्यायधीश माधव जामदार यांनी निकाल दिला आहे.
युझवेंद्र चहल आणि आरजे महवशच्या डेटिंगची चर्चा
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेदरम्यान (Champions Trophy 2025) भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि आरजे महवश (RJ Mahvash) दुबई क्रिकेट मैदानावर अंतिम सामना पाहण्यासाठी उपस्थित होते. युझवेंद्र चहल आणि आरजे महवशला एकत्र पाहिल्यानंतर दोघंही एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.