प्रहार    

राजस्थान रॉयल्स जिंकणार यंदाची आयपीएल ?

  51

राजस्थान रॉयल्स जिंकणार यंदाची आयपीएल ? नवी दिल्ली (वृत्तसंस्था): आयपीएलच्या नव्या हंगामाला २२ मार्चपासून सुरूवात होत आहे. आयपीएलसाठी राजस्थान रॉयल्स संघ नव्या दमाने मैदानात उतरणार असून संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली हा संघ अत्यंत संतुलित दिसत आहे. जोफ्रा आर्चर, वानिंदू हसरंगा आणि महीश तीक्ष्णा यांच्या समावेशामुळे संघाची गोलंदाजी आणखी मजबूत झाली आहे. मात्र यंदाच्या मोसमात संजू सॅमसन आणि राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखालील राजस्थान संघाला जेतेपद मिळवता येईल का, याकडे क्रिकेटप्रेमींचे चांगलेच लक्ष आहे.

राजस्थान रॉयल्सने २०२२ मध्ये अंतिम फेरी गाठली होती, मात्र गुजरात टायटन्सने त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही. तर २०२४ मध्येही संघाने दमदार सुरुवात केली, पण शेवटच्या टप्प्यात अपयश पदरात आले. यंदा संघाने आपल्या चुका सुधारून अंतिम टप्प्यात अधिक मजबुतीने खेळण्याचा निर्धार केला आहे.

राजस्थान रॉयल्सने आपल्या प्रमुख खेळाडूंना कायम ठेवत नव्या हंगामासाठी संघ अधिक मजबूत केला आहे. संघात यशस्वी जैस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर यांसारखे फलंदाज आहेत, तर जोफ्रा आर्चर, महीश तीक्ष्णा आणि वानिंदू हसरंगा यांचा समावेश गोलंदाजीला धारदार बनवतो.

राहुल द्रविडचे लाभणार मार्गदर्शन

गेल्या हंगामात राजस्थानने १४ पैकी ८ सामने जिंकून प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला होता. मात्र, सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्यांना एलिमिनेटरमध्ये पराभव पत्करावा लागला. आता संघ पुन्हा नव्या जोशात उतरून ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करणार आहेत. तसेच भारतीय संघाच्या माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांची राजस्थान रॉयल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे संघाला चांगली रणनीती आणि युवा खेळाडूंना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

राजस्थान रॉयल्सचे संभाव्य शिलेदार

संजू सॅमसन (कर्णधार)
यशस्वी जैस्वाल
रियान पराग
नितीश राणा
ध्रुव जुरेल
शिमरॉन हेटमायर
संदीप शर्मा
जोफ्रा आर्चर
महीश तीक्ष्णा
वानिंदू हसरंगा
फजलहक फारूकी

 
Comments
Add Comment

Team India Asia Cup 2025: आशिया कप २०२५ साठी टीम इंडियाची घोषणा! सूर्या करणार नेतृत्व; शुभमन गिल उपकर्णधार

Team India T20 Squad for Asia Cup 2025: दिनांक ९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कप २०२५ साठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे.

आशिया कपसाठी आज होणार टीम इंडियाची घोषणा, या खेळाडूंच्या निवडीवर प्रश्नचिन्ह

मुंबई: आशिया कप २०२५ साठी भारतीय क्रिकेट संघाची आज (१९ ऑगस्ट, २०२५) घोषणा होणार आहे. यासंबंधी भारतीय क्रिकेट नियामक

आशिया कपसाठी लवकरच होणार टीम इंडियाची घोषणा

मुंबई: आशिया कप २०२५ साठी भारतीय क्रिकेट संघाची निवड लवकरच केली जाण्याची शक्यता आहे. या स्पर्धेत निवड समिती काही

प्रत्येक वेळेस थोडीच रिटायरमेंट घेणार?' रोहित शर्माने निवृत्तीवर दिले मजेशीर उत्तर, पंतने शेअर केला व्हिडिओ

मुंबई: भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त, भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने

लिओनेल मेस्सीचा भारत दौरा ठरला, 'या' तारखेला येणार मुंबईत!

नवी दिल्ली: अर्जेंटिनाचा सुपरस्टार लिओनेल मेस्सीच्या बहुप्रतिक्षित भारत दौऱ्याला अंतिम मंजुरी मिळाली आहे.

Manu Bhaker: ऑलिंपिक पदक विजेती मनू भाकरने व्हायोलिनवर राष्ट्रगीत वाजवून दिली मानवंदना

नवी दिल्ली: ऑलिंपिक पदक विजेती मनू भाकरने व्हायोलिनवर राष्ट्रगीत वाजवून भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा