दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नव्याने चौकशी करण्यात यावी

मुंबई : दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नव्यानं चौकशी करण्यात यावी अशी मागणी करत वडील सतीश सालियन यांची हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. दिशावर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केली आहे. तसेच या प्रकरणात एनआयए चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे. या प्रकरणी आता लवकरच सुनावणी अपेक्षित आहे.

या प्रकरणाचा तपास समीर वानखेडेंसारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली करण्याची मागणी दिशाचे वडील सतीश सालियन यांनी याचिकेच्या माध्यमातून केली आहे. मुंबई पोलिस आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशाभूल करत आपल्यावर दबाव टाकल्याचा दावा दिशाच्या वडिलांचा केला आहे. त्यांनी आपल्याला नजरकैदेत ठेवत मांडलेले पुरावे खरे मानण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोपही या याचिकेतून करण्यात आला आहे.

दिशा सालियानच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेतून आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोर्या यांच्यासह मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तसेच भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे तसेच पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी दिशाच्या मृत्यूबाबत केलेल्या आरोपांत तथ्य असल्याचा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे यांचा कोणताही संबंध नसल्याचा दावा या आधी तिच्या कुटुंबीयांनी केला होता. आता दिशाच्या वडिलांनी नव्याने याचिका दाखल केली आहे.
Comments
Add Comment

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे

शब्दापलीकडे कृती’ची महायुतीकडून वचनपूर्ती युवकांना रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध : राणे म्हणाले की, राज्यातील

मुंबई विमानतळावर ७९ कोटींचे कोकेन जप्त

मुंबई : डीआरआय मुंबईने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७९ कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले असून या प्रकरणी दोन

नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आगामी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते