Sunday, April 20, 2025
Homeताज्या घडामोडीऑनलाईन-गेमिंगच्या १०९७ साईटस बंद, अश्विनी वैष्णव यांची माहिती

ऑनलाईन-गेमिंगच्या १०९७ साईटस बंद, अश्विनी वैष्णव यांची माहिती

नवी दिल्ली : ऑनलाईन गेमिंगच्या समस्येबाबत केंद्र सरकार अतिशय गंभीर आहे. आतापर्यंत 1097 ऑनलाईन गेमिंग साईटस बंद करण्यात आल्याची माहिती केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज, बुधवारी लोकसभेत दिली.

प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान एका प्रश्नाला उत्तर देताना वैष्णव म्हणाले की, राज्य सरकारांशी समन्वय साधून ऑनलाइन गेमिंग आणि सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सतत प्रयत्न केले जात आहेत. संवैधानिक तरतुदींनुसार, आम्ही या समस्येतून मुक्त होण्यासाठी राज्य सरकारांसोबत जलदगतीने काम करू. केंद्र सरकार राज्य सरकारांच्या सहकार्याने यावर काम करत आहे. त्यांनी सांगितले की नियामक संस्था या प्रकरणात चांगले काम करू शकते.

ऑनलाइन गेमिंगच्या तावडीतून लोकांना, विशेषतः मुलांना वाचवण्याच्या प्रयत्नात, १०९७ ऑनलाइन गेमिंग साइट्स बंद करण्यात आल्या आहेत. ऑनलाइन गेमिंग आणि सायबर गुन्ह्यांच्या दुष्परिणामांबद्दल लोक जागरूक होत आहेत. सरकारच्या प्रयत्नांमुळे समाजात सायबर गुन्ह्यांबाबत जागरूकता वाढत असल्याचे वैष्णव यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -