Tuesday, April 22, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMatheran : पर्यटकांसाठी माथेरान बंद; नेमकं कारण काय?

Matheran : पर्यटकांसाठी माथेरान बंद; नेमकं कारण काय?

रायगड : तुम्हीही माथेरानला फिरायला जात आहात तर ही बातमी तुमच्यासाठी. माथेरानमध्ये फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या फसवणुकीच्या तसेच लुटीचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे माथेरानची बदनामी होत आहे. याच पार्श्वभूमीवर आजपासून (दि १८) माथेरानमध्ये बेमुदत बंद केला गेला आहे.

Samay Raina : समय रैनाच्या अडचणीत भर, सायबर सेलने बजावला नवा समन्स

मिळालेल्या माहितीनुसार, दस्तुरी नाक्यावरील येणाऱ्या पर्यटकांची दिशाभूल करून आर्थिक फसवणूक केली जाते. याचा येथील सर्वसामान्य कष्टकरी पासून ते हॉटेल इंडस्ट्री या सर्वांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झालेला आहे. ही फसवणूकीची पध्दत लवकरच बंद करण्यात आली नाही, तर १८ मार्च पासून बेमुदत माथेरान बंद करण्यात येणार असा इशारा समितीने सर्वच अधिकारी वर्गाला दिला होता, त्यासाठी अधीक्षक कार्यालयात समितीच्या सदस्यांच्या बैठकीचे आयोजन सोमवारी १७ मार्च रोजी करण्यात आले होते.

माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने केलेल्या मागण्यांची पूर्तता स्थानिक प्रशासन करू शकत नाही, त्यामुळे समितीने आजपासून बेमुदत बंदची हाक दिली आहे. या बंदला हॉटेल इंडस्ट्री, ई रिक्षा संघटना, व्यापारी वर्ग, विविध सामाजिक संस्था यांनी समर्थन दिले आहे. जोपर्यंत स्थानिक प्रशासन लेखी स्वरूपात मागण्या कायमस्वरूपी पूर्ण करत नाही, तोपर्यंत हे पर्यटनस्थळ बेमुदत बंद करण्यात येणार असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितल आहे. दरम्यान, या बंदमध्ये शालेय विद्यार्थ्यांना ई रिक्षाची सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परंतु येणाऱ्या कोणत्याही प्रवाशांना ही सेवा उपलब्ध नसेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -