मुंबई : क्रिकेट चाहत्यांसाठी जिओ आपल्या विद्यमान आणि नवीन ग्राहकांसाठी एक खास ऑफर घेऊन आला आहे. ₹२९९ किंवा त्याहून अधिक प्लॅनसह नवीन जिओ सिम कनेक्शन घेतल्यास किंवा किमान ₹२९९ चे रिचार्ज केल्यास जिओ ग्राहक जिओहॉटस्टारवर (Jio Hotstar) मोफत आयपीएल क्रिकेट (IPL Cricket) सीझनचा आनंद घेऊ शकणार आहेत.
Adani Electricity : अदानी इलेक्ट्रिसिटीला अमेरिकेत गोल्ड एचआर एक्सलन्स अॅवॉर्ड
या अनलिमिटेड क्रिकेट ऑफरमध्ये ग्राहकांना टीव्ही किंवा मोबाईलवर ९० दिवसांसाठी मोफत जिओहॉटस्टार सबस्क्रिप्शन मिळेल, तेही ४K क्वालिटीमध्ये. म्हणजेच, २२ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएल क्रिकेट सीझनचा मोफत आनंद घेता येणार आहे. जिओहॉटस्टार पॅक २२ मार्चपासून पुढील ९० दिवसांसाठी वैध असेल. ही ऑफर सोमवार दि. १७ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत उपलब्ध असेल. ज्यांनी १७ मार्चपूर्वी रिचार्ज केले असेल, तर ₹१०० च्या अॅड-ऑन पॅकमधून या ऑफरचा लाभ घेऊ शकतात.