Sunday, April 20, 2025
Homeक्रीडाइंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेआधी भारतीय संघ आणखी २ सामने खेळणार!

इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेआधी भारतीय संघ आणखी २ सामने खेळणार!

मुंबई (प्रतिनिधी) : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेनंतर आता साऱ्या क्रिकेट विश्वाचे लक्ष हे आयपीएल १८ व्या मोसमाकडे लागून आहे. रिपोर्ट्सनुसार, भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी आणखी २ सामने खेळणार आहे. भारतीय संघाला इंग्लंड दौऱ्यावर एकूण ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. आयपीएलच्या १८ व्या मोसमानंतर लागलीच भारतीय संघ या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. या मालिकेआधी भारतीय संघाच्या खेळाडूंना किमान २ सराव सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय संघ ए च्या शॅडो टूरला जूनमधील पहिल्या आठवड्यापासून सुरुवात होईल. या संघात भारतीय संघातील मुख्य खेळाडूंचाही समावेश असेल. तसेच या खेळाडूंसह हेड कोच गौतम गंभीर उपस्थित असणार आहेत.

Pak vs NZ : पाकिस्तानचा सलग दुसरा पराभव

आयपीएलच्या १८ व्या मोसमाची २५ मे रोजी सांगता होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. भारतीय संघाची ही आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेतील चौथ्या साखळीतील पहिलीच मालिका असणार आहे. भारतीय संघाच्या या इंग्लंड दौऱ्याची सुरुवात २० जूनपासून होणार आहे. या मालिकेच्या दृष्टीने २ सराव सामने हे निर्णायक ठरणार आहेत.

आयपीएलची आजपासून ऑनलाईन तिकीटविक्री

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय संघ ए विरुद्ध इंग्लंड लायन्स यांच्यात ४ जूनपासून ४ दिवसीय सराव सामना खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर इन्ट्रा स्क्वाड मॅच खेळवण्यात येईल. तसेच त्यानंतर इंडिया विरुद्ध इंग्लंड लायन्स यांच्यातील दुसरा सराव सामना पार पडेल. निवड समितीकडून अनेकदा देशांतर्गत क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूंना सराव सामन्यांत संधी देण्यात आली आहे. मात्र प्रमुख खेळाडूंचा सराव ही देखील महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे कसोटी संघातील प्रमुख खेळाडूंचाच इंडिया ए संघात समावेश असेल, अशी शक्यता आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधीही भारतीय संघ विरुद्ध इंडिया ए यांच्यात काही सामने खेळवण्यात आले होते. तसेच आयपीएलनंतर थेट भारतीय संघाला रेड बॉलने (कसोटी क्रिकेट) खेळायचे आहे. तसेच बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील कामगिरी पाहता या इंडिया ए च्या सामन्यांना महत्त्व प्राप्त झालं आहे.

भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिला सामना, २० ते २४ जून, लीड्स
दुसरा सामना, २ ते ६ जुलै, बर्मिंगघम
तिसरा सामना, १० ते १४ जुलै, लॉर्ड्स
चौथा सामना, २३ ते २७ जुलै, मँचेस्टर
पाचवा सामना, ३१ जुलै ते ४ ऑगस्ट, लंडन

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -