ठाणे : ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एकीकडे सूर्य आग ओकत असताना ठाणेकरांसमोर नवं आव्हान उभं राहिलं आहे. ठाणेकरांचा पाणीपुरवठा २४ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गैरसोय होणार आहे.
Shivsena : विधान परिषदेसाठी शिवसेनेचा उमेदवार ठरला! ‘या’ नेत्याला मिळणार संधी
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभूळ जलशुध्दीकरण केंद्रात, तातडीचे आणि अत्यंत महत्वाचे देखभाल दुरुस्तीचे काम करायचे असल्याने सोमवार दि. १७/०३/२०२५ रोजी रात्री १२.०० पासून ते मंगळवार दि. १८/०३/२०२५ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत एकूण २४ तासांसाठी ठाणे महापालिका क्षेत्रात कळवा, मुंब्रा आणि दिवा या परिसरात २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
तसेच, मंगळवारी रात्री पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील काही तास कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तरी नागरिकांनी आवश्यक तो पाणीसाठा करून ठेवावा तसेच पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेने केले आहे.