मुंबई (प्रतिनिधी) : दावोसमध्ये एमएमआरडीए आणि क्रॉसरेल इंटरनॅशनलमध्ये मेट्रो प्रकल्पातील कार्यप्रणाली, देखभाल सुरक्षा यासह अन्य कामे आणि सेवांकरीता मदतीचा हात देण्यासाठी सांमजस्य करार करण्यात आला होता. त्यानुसार आता क्रॉसरेल आणि एमएमआरडीएने कामास सुरुवात केली आहे. नुकतीच यादृष्टीने एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून मेट्रो प्रकल्पातील सेवा-सुविधांना आता बळकटी मिळणार आहे.
एमएमआरडीए एमएमआरमध्ये ३३७ किमी लांबीचे मेट्रोचे जाळे विणत आहे. सध्या ३३७ किमीपैकी मुंबईत अंदाजे ५९ किमी लांबीच्या मेट्रो मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाल्या आहेत. यात मेट्रो १ (घाटकोपर अंधेरी वर्सोवा), मेट्रो २ अ (दहिसर अंधेरी प.), मेट्रो ३ (आरे बीकेसी), मेट्रो ७ (दहिसर गुंदवली) या मार्गिकांचा यात समावेश आहे. येत्या एक-दोन वर्षांत आणखी काही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होणार आहेत.
मेट्रो सेवा ही वाहतुकीचा कार्यक्षम पर्याय ठरवा यासाठी एमएमआरडीएकडून मेट्रो प्रकल्पातील विविध सुविधांना बळकटी देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून नुकत्याच झालेल्या दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम २०२५ मध्ये एमएमआरडीए आणि क्रॉसरेलमध्ये एक सांमजस्य करार झाला. या करारानुसार युकेमधील क्रॉसरेल इंटरनॅशनल एमएमआरमधील मेट्रो प्रकल्पांमधील विविध सेवांसाठी आवश्यक ती मदत करणार आहे. विविध सेवांना बळकटी देण्याच्या दृष्टीने क्रॉसरेल एमएमआरडीएला सहकार्य करणार आहे. मेट्रो प्रकल्पातील कार्यप्रणाली, देखभाल, सुरक्षा, डिजिटल परिवर्तन या सेवा आणखी मजबूत करून मेट्रो वाहतूक कार्यक्षम करण्यासाठी आता क्रॉसरेलची मदत होणार आहे.
क्रॉसरेलकडून आता प्रत्यक्ष कामास सुरुवात झाल्याची माहिती महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली. डॉ. मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक पार पडली असून यात युकेचा वाहतूक विभाग आणि क्रॉसरेल इंटरनॅशनलमधील तज्ज्ञांचा समावेश होता. यावेळी मेट्रो प्रकल्पातील विविध सेवांना बळकटी देण्याच्या दृष्टीने अनेक विषयांवर चर्चा झाल्याचेही डॉ. मुखर्जी यांनी स्पष्ट केले. आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याने येत्या काळात एमएमआरमधील मेट्रोची वाहतूक नक्कीच एक कार्यक्षम, म्हणून ओळखला जाईल असा मजबूत वाहतूक पर्याय विश्वासही यानिमित्ताने व्यक्त केला आहे.
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…