Haous Lake Mahad : महाड शहराच्या सौंदर्यात पडणार भर

महाड  : ऐतिहासिक तळे म्हणून ओळख महाड शहरातील या हापूस तळ्याची ओळख आहे. महाड शहरातील विविध भागात अनेक प्राचीन तळी आहेत. त्यातील चवदार तळे जागतीक नकाशावर आहे. गांधारीनाका परिसरात महाड शहरात प्रवेश करणाऱ्या मुख्य रस्त्यालगत हापूस तळे आहे. इतिहास काळात महाड हे बंदर होते व येथून मोठ्या प्रमाणात धान्ये व वस्तूंची उलाढाल होत असे. त्याकाळी रस्ते, पूल या सुविधा नव्हत्या. तेव्हा होडीनेच सामानाची वाहतूक होत असे. या होड्यांवर हबशी म्हणून काम करणारे या ठिकाणी पाण्याची सोय असल्याने मुक्कामाला उतरत असत. काम संपल्यावर माघारी जात त्यामुळे या तळ्याला हाबूस व नंतर हापूस तळे असे नाव पडल्याचे जूने जाणकार सांगतात.



हे तळे बुजलेले होते. तर आतमध्ये रानटी वनस्पतीही उगवलेल्या होत्या. परिसरातील इमारतींचे सांडपाणीही या तळ्यात जात होते. असे हे तळे अनेक वर्षे दुर्लक्षित होते. आता या तळ्याचा विकास नगर पालिकेने हाती घेतला आहे. तळ्यातील गाळ काढून उत्पाद देखील तयार करण्यात आला, परंतु यानंतर मात्र महाडमध्ये २०२१ मध्ये आलेल्या महापुरामुळे या तळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात चिखल साठला होता, तर फुटपाथ काम देखील खराब झाले, परंतु आता पुन्हा सध्या तळे साफ करण्याचे काम सुरू आहे. तळ्याचे खोदकाम केले जाणार असून गॅब्रियन वॅाल बांधल्या जाणार आहेत. तळ्याच्या भोवती सुमारे पाचशे मीटरच्या लांब व साडेचार फूट रुंद ट्रॅक राहणार आहे, भोवताली बाग, स्वच्छतागृह, पायऱ्या व बाजूने सांडपाणी झिरपू नये यासाठी गटारांची सुविधा केली जाणार आहे.

Comments
Add Comment

फडणवीस सरकारची ‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या दिशेने वाटचाल

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; महायुती सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त विशेष संवाद मुंबई : “पंतप्रधान नरेंद्र

‘ओंकार’ हत्तीला ‘वनतारा’कडे हस्तांतरित करू नये

उच्चाधिकार समितीचा निकाल सावंतवाडी : महाराष्ट्र आणि गोवा सीमेवर ‘ये-जा’ करणाऱ्या ‘ओंकार’ हत्तीला ‘वनतारा’कडे

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

महावितरणमध्ये एआय तंत्रज्ञानाच्या आधारित डिजीटलायझेशन

तांत्रिक किचकट अडचणी दूर होणार मुंबई : राज्यात सौर ऊर्जेसह नवीनीकृत ऊर्जा स्त्रोतांच्या ‘डिजिटल ट्वीन’

गटशिक्षण अधिकाऱ्यांसह तीन अधिकारी निलंबित !

जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांचा आदेश पालघर : शाळेत यायला उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना उठाबशा

चौलच्या पर्वतवासी श्री दत्तात्रेय देवस्थानच्या यात्रेला सुरुवात

सोमवारी, ८ डिसेंबरला पाच दिवसाच्या यात्रेचा होणार समारोप अलिबाग : चौलच्या पर्वतवासी श्रीदत्तात्रेय