PM Narendra Modi RSS : ‘आरएसएसला समजून घेणे सोपे नाही, त्यांचे कार्य समजून घेणे आवश्यक’

Share

नवी दिल्ली : ‘बालपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस)च्या बैठकांना उपस्थित राहणे माझ्यासाठी आनंददायी होते. आपण देशासाठी समर्पित जीवन जगावे हे मला ‘आरएसएस’ने शिकवले. या वर्षी १०० वर्षे पूर्ण करणाऱ्या ‘आरएसएस’पेक्षा जगात अन्य दुसरा मोठा ‘स्वयंसेवी संघ’ नाही. आरएसएस समजून घेणे सोपे काम नाही, त्याचे कार्य समजून घेणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रिडमन यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीमध्ये ते बोलत होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी लेक्स फ्रिडमन यांच्याशी विविध मुद्यांवर चर्चा केली.

यावेळी नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) म्हणाले की, मला ‘आरएसएस’सारख्या प्रतिष्ठित संघटनेकडून जीवनाचे सार आणि मूल्ये शिकायला मिळाली यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. देशाची सेवा करणे हे मला ‘संघ’नेच हेच शिकवले. या वर्षी आरएसएस १०० वर्षे पूर्ण करत आहे. जगात आरएसएसपेक्षा मोठी ‘स्वयंसेवी संघटना’ नाही. आरएसएस समजून घेणे सोपे काम नाही, त्याचे कार्य समजून घ्यावे लागेल. राष्ट्र हेच सर्वस्व आहे आणि समाजसेवा हीच देवाची सेवा आहे, हे आरएसएस सदस्यांना शिकवते.

आपल्या वैदिक संतांनी आणि स्वामी विवेकानंदांनी शिकवले तेच संघही शिकवतो. शिक्षणात क्रांती घडवून आणण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही सदस्यांनी ‘विद्या भारती’ नावाची संघटना सुरू केली. ते देशभरात सुमारे २५ हजार शाळा चालवतात. या शाळांमध्ये एकावेळी ३० लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. डाव्या विचारसरणीच्या लोकांनी चालवलेली कामगार चळवळ ‘जगातील कामगारांनो, एकत्र या!’ अशी आहे. तर आरएसएसची कामगार संघटना ‘कामगारांनो, जगाला एकत्र करा!’ असा नारा देते, असेही नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान मोदींना गुजरातच्या २००२ मधील दंगल प्रकरणावरही प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी मोदींनी मौन सोडत गुजरात दंगल प्रकरणावरही भाष्य केलं. तसेच जे त्या प्रकरणात दोषी होते, त्यांना कायद्यानुसार शिक्षा झाल्याचे त्यांनी सांगितले. २००२ च्या गुजरात दंगलींकडे मोदी कसे पाहतात? असं विचारलं असता मोदी म्हणाले की, “२००२ च्या दंगली भोवतीच्या चर्चेला खोटी कहाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. २००२ पूर्वी गुजरातमध्ये २५० हून अधिक दंगली झाल्या होत्या आणि जातीय हिंसाचार वारंवार होत होता. २००२ पूर्वी देशात सतत दहशतवादी हल्ले आणि अस्थिरतेचे वातावरण होते, त्यामुळे तणाव शिगेला पोहोचला होता. तेव्हा जगातही दहशतवादी कारवायांमध्येही वाढ दिसून आली होती. १९९९ मध्ये कंधार अपहरण प्रकरण झालं होतं, २००० मध्ये लाल किल्ल्यावर हल्ला झाला होता आणि २००१ मध्ये आपल्या संसदेवर हल्ला झाला होता. तो काळ मोठ्या आव्हानांचा होता. पण २००२ नंतर गुजरातमध्ये एकही मोठी दंगल घडलेली नाही. आता राज्यात कायमस्वरूपी शांतता आहे”, असे मोदी म्हणाले.

पीएम मोदी यांनी पाकिस्तानाबाबत आपली मते स्पष्ट केली. ते म्हणाले की, १९४७ पूर्वी सर्वजण खांद्याला खांदा लावून स्वातंत्र्यासाठी लढत होते. त्यानंतर देशाच्या धोरणकर्त्यांनी भारताची फाळणी मान्य केली आणि मुस्लिमांना त्यांचा देश दिला. हे भारतातील जनतेने मोठ्या जड अंतकरणाने मान्य केले, पण त्याचे परिणामही भोगावे लागले. या फाळणीमुळे झालेल्या हत्याकांडात लाखो लोक मारले गेले.

Recent Posts

Nashik News : नाशिककरांची उन्हाच्या चटक्यांमुळे सिग्नलवर थांबण्याची दमछाक!

नाशकात दुपारी १ ते ४ दरम्यान ट्रॅफिक सिग्नल राहणार बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय! नाशिक :…

48 minutes ago

Amruta Khanvilkar: आलेच मी…’, या सईच्या गाण्यावर अमृता खानविलकर थिरकली!

नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा पाऊस मुंबई: सध्या मराठी कलाविश्वात सई ताम्हणकरच्या ‘आलेच मी’ या लावणीची जोरदार…

1 hour ago

Beed : बीडचा पाणी प्रश्न सोडवणार, गहिनीनाथ गडाला तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करणार; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळवून देण्याचे तसेच गहिनीनाथ गडाला…

1 hour ago

Cold Water Benefits : थंड पाण्याने चेहरा धुतल्यास होतील ‘हे’ फायदे!

निरोगी त्वचा असणे ही सर्वांचीच इच्छा असते. मात्र, निरोगी आणि सुंदर दिसणाऱ्या त्वचेची योग्य काळजी…

2 hours ago

Pune News : स्मार्ट पुण्यात बनावट कपड्यांचा सुळसुळाट!

पुणे : चितळे प्रकरण ताजे असतानाच पुण्यामध्ये ब्रँडेड कंपन्यांच्या नावे बनावट कपडे विकल्याची माहिती समोर…

2 hours ago

Dhananjay Munde : धक्कादायक, आमदार धनंजय मुंडेंना झाला ‘हा’ आजार

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी (Bell's palsy) हा आजार झाला…

2 hours ago