मुंबईतील नॅशनल पार्कचा प्रवेश महागला, इतर सेवांच्या तिकिटांच्या दरातही १० टक्के वाढ

मुंबई : रिक्षा, टॅक्सी आणि एसटीच्या भाड्यात आधीच सरकारने वाढ करून सर्वसामान्यांना अडचणीत टाकले होते, आता पर्यटकांच्या खिशावरही टोल घेतला आहे. बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे प्रवेश शुल्क 94 रुपयांवरून 103 रुपये करण्यात आले आहे.तसेच इतर सेवांच्या तिकिटांच्या दरातही 10 टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे उन्हाळी सुट्टीच्या तोंडावरच ही मोठी दरवाढ झाल्याने पर्यटकांची संख्या घटली आहे.


मुंबईकर रविवारी व सुट्टीच्या दिवशी नॅशनल पार्कमध्ये कुटुंबासह फिरायला जातात. मात्र, सरकारच्या या दरवाढीने त्यांच्या आनंदावर पाणी फेरले आहे. सध्या नॅशनल पार्कमध्ये प्रवेशासाठी 103 रुपये भरावे लागत आहेत. याशिवाय, लायन सफारी, टायगर सफारी, सायकलिंग आणि कान्हेरी गुंफा भेटीसाठी वेगळे तिकीट घ्यावे लागत आहे, आणि त्यांच्याही दरात 10 टक्के वाढ करण्यात आली आहे. परिणामी, प्रत्येक व्यक्तीला किमान 1000 रुपयांचा खर्च येत आहे, जो सर्वसामान्य मुंबईकरांच्या आवाक्याबाहेर गेला आहे.


यामुळे होळी, धूलिवंदन आणि विकेंडच्या सलग सुट्ट्यांमध्येही नॅशनल पार्कमध्ये अपेक्षित गर्दी दिसून येत नाही. उलट पर्यटकांची संख्या लक्षणीय घटली आहे. पर्यटन क्षेत्रातील जाणकारांच्या मते, सरकारची ही भूमिका पर्यटनासाठी 'मारक' ठरत आहे. दरम्यान, नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांसाठी सूचना पेटी ठेवण्यात आली आहे, जिथे पर्यटकांना सेवा व सुविधांबाबत अभिप्राय नोंदवता येतो. मात्र, याठिकाणी सरकारविरोधी संतप्त प्रतिक्रिया अधिक आढळत आहेत. वाढीव तिकीट दरामुळे नाराज पर्यटक सरकारवर टीका करत आहेत.


लहानग्यांचे आकर्षण असलेली 'टॉय ट्रेन' मागील चार वर्षांपासून बंद आहे. प्रशासनाने ही ट्रेन मे महिन्याच्या सुट्टीत सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ट्रॅक व इतर कामे पूर्ण होण्यास अजून तीन-चार महिने लागतील, असे नॅशनल पार्कमधील सूत्रांनी सांगितले. त्यामुळे पर्यटकांना अजूनही प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Comments
Add Comment

मुंबईत आता मोठ्या आकाराच्या जाहिरात फलकाला बंदी..

फुटपाथ आणि गच्चीवरही जाहिरात लावण्यास नसेल परवानगी मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत मागील अनेक महिन्यापासून

Maharashtra Winter Session 2025 : अखेर विधीमंडळ अधिवेशनाची तारीख १ डिसेंबरला ठरणार!

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Body Elections) निवडणुकांमुळे रखडलेल्या महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशनाच्या (Maharashtra

मुंबईतील प्रतिजेजुरी पाहिलीत का? मुंबईतही आहे खंडोबाचे पवित्र देवस्थान

मुंबई : चंपाषष्ठीचा शिवशंकराच्या अवतार मानल्या जाणाऱ्या श्री खंडोबा देवाचा उत्सव राज्यभर मोठ्या भक्तिभावात

शतकातील सर्वात मोठं सूर्यग्रहण; २०२७ मध्ये होणार ६ मिनिटांचा अंधार

मुंबई : येणाऱ्या वर्षात म्हणेजच २ ऑगस्ट २०२७ रोजी शतकातील सर्वात मोठं आणि दुर्मिळ खग्रास सूर्यग्रहण पाहायला

मालाड आणि गोरेगावमधील दोन मनोरंजन मैदानांचा होणार विकास

गोरेगाव पहाडीतील मोकळ्या जागेवर उभारले जाणार मनोरंजन मैदान सरदार वल्लभभाई मनोरंजन मैदानाचे होणार

प्रारुप मतदार यादीवर हरकती, सूचना नोंदवण्यास मुदतवाढ

हरकती आता ३ डिसेंबर २०२५ पर्यंत नोंदवता येणार मागील सात दिवसांत २१६७ हरकती, सूचना नोंदवल्या मुंबई (विशेष