ऋतुरंग

सहा ऋतू येतात
हातात हात गुंफूनी
निसर्गराजा सांगतो
त्यांची आगळी कहाणी

ग्रीष्मात ताप उन्हाच
सुना सुना शेतमळा
डवरलेला गुलमोहर
मनास देई विरंगुळा

वाजत गाजत येतो
मग वर्षा ऋतू धावून
रिमझिम गाण्यात मन
चिंब जाई न्हाऊन

हसत नाचत हेमंत
हळूच उतरतो भूवरी
शेत डोलते पिकांनी
हिरवी साद भरजरी

शरद ऋतू घेऊन येतो
थंडी धुक्यातली भारी
शेकोटीची मजा आणि
हुरड्याची चव न्यारी

हलकेच येतो शिशिर
वाढत जाई गारवा
पानगळ होते सुरू
केसांत फुले मारवा.

वसंताची चाहूल लागता
बहरली पुन्हा सृष्टी
पानाफुलांनी रंग उधळले
देखणी झाली दृष्टी

प्रत्येक ऋतूचा येथे
वेगळाच आहे थाट
अलगद येऊन धरेवर
जणू खेळतो सारीपाट

काव्यकोडी - एकनाथ आव्हाड


१) सम्राट शहाजहानने बांधलेला
मुघल साम्राज्यात वाढलेला
लाल वाळूच्या खडकांपासून
भक्कम उभा राहिलेला

यमुना नदीच्या किनारी
हा किल्ला उभा बळकट
दिल्लीतील या किल्ल्याचे
नाव सांगा पटपट ?

२) तेराव्या शतकात ही मिनार
बांधायला सुरुवात झाली
जागतिक वारसा म्हणून
नावारूपास देखील आली

नाव मिळाले या मिनारला
कुतुबुद्दीन ऐबक यांचे
काय नाव दिल्लीतल्या
या प्रेक्षणीय स्थळाचे ?

३) चिरंतन ज्योत येथे
जी कधीच विझत नाही
शहीद सैनिकांसाठी
ती सदा तेवत राही

या भव्य वास्तूच्या भिंतीवर
सैनिकांची कोरली नावे
भारतातील या राष्ट्रीय
स्मारकाचे नाव सांगावे ?

उत्तर -


१) लाल किल्ला
२) कुतुबमिनार
३) इंडिया गेट
Comments
Add Comment

समस्या...?

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ सोशल मीडियावर एक बातमी वाचली. त्या बातमीतील घटना खूप अस्वस्थ करून गेली. त्या

स्वयंप्रतिमा

गोष्ट लहान, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर मनुष्याच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे

मला शिकायचंय...

कथा : रमेश तांबे सुरज एक शाळकरी मुलगा होता. हातात पिशवी नाही की खिशात पैसे नाहीत. बाबांच्या टोचून बोलण्याचा त्याला

वाचनाचे महत्त्व?

कथा : प्रा. देवबा पाटील उद्या सीता व नीताची मावशी तिच्या गावाला जाणार होती. म्हणून त्या थोड्याशा नाराजच होत्या.

बाई माणूस म्हणून जगताना...!

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ आज ‘जागतिक महिला दिन’ आहे. हा दिवस जगभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे साजरा

स्वत:ची ओळख, स्वत:ची ताकद - आजची स्त्री, उद्याचा भारत!

गोष्ट लहान, अर्थ महान : शिल्पा अष्टमकर आजची स्त्री म्हणजे केवळ घराची जबाबदारी सांभाळणारी व्यक्ती नसून, ती शिक्षण,