Monday, April 21, 2025
Homeब्रेकिंग न्यूजSunita Williams : आनंदाची बातमी, सुनिता विल्यम्सला परत आणण्यासाठी यान पोहोचले

Sunita Williams : आनंदाची बातमी, सुनिता विल्यम्सला परत आणण्यासाठी यान पोहोचले

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक : फक्त आठ दिवसांच्या विशेष मोहिमेसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेलेले बुच विल्मोर आणि सुनिता विल्यम्स हे दोन अंतराळवीर मागील नऊ महिन्यांपासून तिथेच अडकले आहेत. तांत्रिक कारणामुळे त्यांना दोघांना अद्याप पृथ्वीवर परत आणता आलेले नाही. अखेर नासा आणि स्पेसएक्स यांनी एक संयुक्त प्रकल्प राबवून बुच विल्मोर आणि सुनिता विल्यम्स या दोघांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरुन परत पृथ्वीवर आणण्याची व्यवस्था केली आहे. दोन्ही अंतराळवीरांना परत घेऊन जाण्यासाठी एक अंतराळ यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले आहे. हे यान पोहोचताच बुच विल्मोर आणि सुनिता विल्यम्स या दोघांनी आनंद व्यक्त केला. अंतराळवीर सुनिता विल्यम्सने नृत्य करुन आनंद व्यक्त केला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

सुनिता विल्यम्सचा अंतराळातील मुक्काम वाढला

फाल्कन नऊ रॉकेटच्या मदतीने क्रू १० मोहिमेच्या अंतर्गत ड्रॅगन नावाचे यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले आहे. या यानातून चार ताज्या दमाचे अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले आहेत. आता याच यानातून बुच विल्मोर आणि सुनिता विल्यम्स हे दोन अंतराळवीर पृथ्वीवर परतणार आहेत. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचलेल्या चार अंतराळवीरांपैकी दोन अमेरिकेचे एक जपानचा आणि एक रशियाचा आहे. अमेरिकेचे एन. मॅकलन आणि निकोल आयर्स, जपानचा तुकुया ओनिशी आणि रशियाचा किरिल पेस्कोव हे अंताळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले आहेत.

विधान परिषदेसाठी भाजपकडून तीन उमेदवारांची नावं जाहीर

नवे अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले त्यावेळी सुनिताने तिला झालेला आनंद नृत्य करुन साजरा केला. सर्व अंतराळवीरांनी एकमेकांची गळाभेट घेतली. बुच विल्मोर आणि सुनिता विल्यम्स पुढील काही दिवस नव्याने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर आलेल्या अंतराळवीरांना मार्गदर्शन करतील. नंतर बुच विल्मोर आणि सुनिता विल्यम्स ड्रॅगन यानातून पृथ्वीवर परततील. सर्व काही नियोजनानुसार झाले तर बुधवार १९ मार्च रोजी ड्रॅगन यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरुन निघेल आणि पुढील काही तासांत अमेरिकेत फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर उतरेल.

वाहनावर फास्टॅग लावा अन्यथा दुप्पट पैसे भरा

बुच विल्मोर आणि सुनिता विल्यम्स हे दोघे बोईंग आणि नासा यांचा संयुक्त प्रकल्प असलेल्या जॉइंट क्रू फ्लाइट टेस्टसाठी अंतराळात गेले होते. त्यांचे काम पूर्ण झाले तरी तांत्रिक समस्येमुळे दोघांनाही नऊ महिने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर थांबावे लागले. अखेर आता दोघे पृथ्वीवर परत येत आहेत.

काय म्हणाले ट्रम्प ?

बायडेन प्रशासनाने बुच विल्मोर आणि सुनिता विल्यम्स यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर सोडून दिले पण परत आणण्याची जबाबदारी पार पाडली नाही. आता सत्तांतर झाले आहे. माझ्या आदेशानंतर अॅलन मस्कच्या स्पेसएक्सने नासासोबत काम सुरू केले आहे. लवकरच बुच विल्मोर आणि सुनिता विल्यम्स सुखरुप पृथ्वीवर यावेत हीच इच्छा असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -