Dehu Tukaram Beej Sohla : देहूनगरीत संत तुकाराम बीज सोहळा उत्साहात साजरा!

  147

ज्ञानोबा-तुकोबाच्या गजरात भाविकांची मांदियाळी


देहू : देहूनगरीत आज जगदगुरु संत श्री तुकाराम महाराज यांचा त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी बीज सोहळा संपन्न होत आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्यभरामधून लाखो भाविक (Dehu Tukaram Beej Sohla) देहूत दाखल झाले आहेत. टाळ-मृदुंगाचा गजर आणि ज्ञानोबा-तुकोबाचा जप करीत राज्यभरातून अनेक दिंड्या देहूनगरीत दाखल झाल्या आहेत. त्यामुळे इंद्रायणी नदीचा काठ वारक-यांच्या गर्दीने फुलून गेला आहे.



दरम्यान, बीज सोहळ्यानिमित्त मुख्य मंदिर आणि गाभाऱ्याला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली असून ७५व्या बीज सोहळ्यानिमित्त एकनाथ शिंदे यांचे देहून संस्थानाकडून गौरव करण्यात आला आहे. त्याचबरोबर  त्यांना संत तुकाराम महाराज पुरस्काराने स्नमानित करण्यात आले आहे.



नगरपंचायत प्रशासनाकडून विविध कामांचे आयोजन


बीज सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहू नगरपंचायत प्रशासनाकडून विविध कामे करण्यात आली असून पाणीपुरवठा स्वच्छतासाठी सज्ज आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने गाथा मंदिर, मुख्यमंदीर, वैकुंठस्थान मंदिर, मुख्य कमान, बीएससी केंद्रामध्ये बाह्य रुग्ण तपासणी केंद्र उभारण्यात आले असून मुबलक औषध साठा उपलब्ध करण्यात आला आहे. त्याचबरोबर लाखो वारकऱ्यांच्या सोयी सुविधा आणि सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुख्य मंदिर वैकुंठ गमन स्थान मंदिर परिसर, तसेच नगरपंचायत प्रशासनाकडून सुमारे ३० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आले आहेत. देहूमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व मार्ग बीज सोहळ्यासाठी बॅरिकेटिंग उभारून बंद करण्यात आले आहेत.



पदपथ, रस्त्यांवर व्यवसायास बंदी


देहूनगरीत सोहळ्यानिमित्त पदपथावर तसेच रस्त्यांवर फळे, फुल विक्रेते, खेळणी व इतर साहित्य, खाद्यपदार्थ विक्रेते हातगाड्या लावून, तसेच रस्त्यांवरील जागा अडवून विक्री व्यवसाय करतात. त्यामुळे रस्ता अरुंद होऊन चेंगराचेंगरी घडण्याच्या शक्यता आहे. पाकीट, मोबाईल, दागिन्यांची चोऱ्या घडण्याच्या घटनाही घडतात. यामुळे भाविकांच्या सोयी सुविधा व सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी बीज सोहळ्यासाठी दोन दिवसांसाठी पदपथांवर आणि रस्त्यांवर व्यवसाय करणाऱ्यांना बंदी करण्यात आली आहे.



तुकाराम बीज काय आहे?


संत तुकाराम महाराजांचा जन्म देहू गावात वसंत पंचमीला माघ शुद्ध पंचमीला झाला. तर त्यांचं वैकुंठ-गमन फाल्गुन वद्य द्वितीयेला झालं असं मानलं जातं. संत तुकाराम महाराजांना देव सदेह वैकुंठात घेऊन गेल्याची मान्यता आहे. या दिवसाला तुकाराम बीज म्हटलं जातं. तुकाराम महाराजांचं वैकुंभगमन देहू (पुणे) येथे इ.स. १६४९ मध्ये झाले, असं वारकरी संप्रदाय मानतो. या दिवशी नांदुरकी वृक्ष (देहू येथील एक झाड) दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी हलतो, असा भक्तांचा विश्वास आहे. वारकरी संप्रदायासाठी हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. यावेळी पंढरपूरहून आणि इतर गावांमधून मोठ्या संख्येने वारकरी देहू येथे येतात. नामस्मरण, कीर्तन, प्रवचन, भजन आणि गाथा पारायणाचे आयोजन होते.

Comments
Add Comment

महादेवी हत्तिणीला ‘वनतारा’मध्ये पाठवण्याबाबतचा अहवाल

पेटा संस्थेमार्फत सत्यपरिस्थिती नमूद कोल्हापूर : महादेवी या हत्तिणीला कोल्हापूर मधील एका मठातून वनतारा येथे

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील

डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य

बोगस डॉक्टरांना बसणार आळा पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता

भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज, पावसाची चिंता मिटली; राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफा

पुणे (वार्ताहर) : दूरगावी असणाऱ्या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे. तसेच

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी ताब्यात

नागपूर:  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निर्मानाधीन निवासस्थान बॉम्बने उडवण्याची