
मुंबई : होळी, शिमग्याचा सण महाराष्ट्रभर साजरा केला गेला. कामानिमित्त मुंबई, पुणे अशा महानगरांमध्ये स्थानिक झालेले अनेक चाकरमानी शिमगोत्सवासाठी कोकणात निघाले होते. आता सण साजरा करुन चाकरमानी परतीचा प्रवास करणार आहेत. रविवारी १६ मार्च रोजी मुंबई-गोवा महामार्गावर २४ तास अवजड वाहनांना बंदी असणार आहे. यासंबंधित अधिसूचना रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून जारी करण्यात आली आहे. (Holi Special)

पुणे : गावी जाण्यासाठी स्वारगेट आगारात बसची वाट पाहणाऱ्या एका २६ वर्षीय मुलीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार करण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वीच ...
वाहतूक बंदीतून इंधन, स्वयंपाकाचा गॅस, भाजीपाला, औषधे, ऑक्सिजन अशा जीवनाश्यक वस्तूंना वगळण्यात आले आहे. रविवारी मुंबई-गोवा महामार्गावर दुपारी १२ वाजल्यापासून ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत अवजड वाहतूक बंद राहणार आहे. होळीसाठी कोकणात गेलेल्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा, त्यांना त्रास होऊ नये व वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी अवजड वाहतूकीवर बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.