मुंबई : मुंबईमध्ये देखील तापमानत वाढ होत आहे. त्यामुळे उन्हाळा सुरु होताच पाणीटंचाईची समस्या निर्माण होऊ लागली आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाच्या कडाक्यामुळे पाण्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. तसेच धरणांतील पाण्याचे बाष्पीभवनही मोठ्या प्रमाणात होत आहे.
Shirdi News : शिर्डीत भाविकांची लूट करणाऱ्या तीन दुकानदारांवर कारवाई
पावसाळ्याला अजून तीन महिने बाकी आहेत. अशातच आता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाण्याची पातळी ही झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना धरणांमध्ये असणाऱ्या पाणीसाठ्यावरच अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळे नाागरिकांनी पाणी जपून वापरावे असे पालिकेकडून सांगण्यात येत आहे.