Sunday, April 20, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेThane News : अल्पवयीन मुलाच्या हातात कार देणे पडले महागात!

Thane News : अल्पवयीन मुलाच्या हातात कार देणे पडले महागात!

ठाणे : राज्यात वाहन परवाना मिळविण्यासाठी किमान वय १८ वर्षे असणे गरजेचे आहे. तसेच परवान्या शिवाय वाहन चालविणे कायद्याने गुन्हा आहे. असे असले तरी काही नागरिक या कायद्याचा भंग करतात. परंतु पोलिसांच्या तपासणीदरम्यान परवाना नसलेले चालक आढळल्यावर मात्र त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागते. असाच प्रकार ठाण्यात उघडकीस आला आहे.

आनंदनगर परिसरातील रस्त्यावर कार चालवित असलेल्या एका अल्पवयीन मुलावर तसेच वाहन परवाना नसतानाही त्याला कार चालविण्यासाठी दिली म्हणून त्याच्या वडीलांवर ठाणे वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. त्यांच्याकडून दहा हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. या कारवाईच्या निमित्ताने अल्पवयीन मुलाच्या हातात कारची चावी देणे वडीलांना महागात पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Ulhasnagar : उल्हासनगरमध्ये धुळवडीच्या सणाला ‘गालबोट’; छेडछाडीसह हाणामारीच्या ४ घटना

ठाणे आयुक्तालय क्षेत्रात ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी शहरांचा भाग येतो. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात होळी आणि धुलिवंदनाच्या दिवशी ठाणे वाहतुक पोलिसांनी ठिकठिकाणी पथके तैनात केली होती. ही पथकाने श्वास विश्लेषक यंत्राद्वारे चालकांची तपासणी करीत होती. याशिवाय पोलिसांच्या पथकाने चौका-चौकात उभे राहून नेहमीप्रमाणे कारवाई करत होती.

यावेळी घोडबंदर येथील आनंदनगर भागातील अंतर्गत रस्त्यावर एक अल्पवयीन मुलगा कार चालवित असल्याची बाब वाहतूक पोलिसांच्या कासारवडवली शाखेतील पोलिसांच्या निदर्शनास आली. त्यांनी त्या मुलाला रोखले आणि त्याची चौकशी केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -