Devmanus : तो 'देवमाणूस' परत येतोय

मुंबई : मनोरंजनाच्या माध्यमातून जनजागृती करणे हा कलाकारांचा हेतू असतो. सत्य घटनेवर आधारित असलेल्या हातावर मोजण्याइतक्या मालिका असल्या तरी अशा मालिका प्रेक्षकांना भुरळ घालतात. अशाच एका मालिकेने काही वर्षांपुर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र त्या मालिकेतील पात्रांनी आणि मालिकेच्या संवादाने प्रेक्षकांची मने जिंकली. प्रेक्षकांच्या याच प्रेमामुळे या मालिकेचा नवीन अध्याय प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका दुसरी तिसरी कोणती नसून सर्वांची आवडती 'देवमाणूस' (Devmanus) आहे.


'देवमाणूस' मालिकेच्या आधी दोन भागात खेड्यातील डॉक्टरची कथा दाखवण्यात आली होती. खेड्यातील लोक डॉक्टरला देवमाणूस मानतात आणि त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि तो देवमाणूस कसा त्यांचा फायदा घेतो हे चित्रण त्यात पाहायला मिळते. 'देवमाणूस' मालिकेच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांकडून भरपूर प्रतिसाद मिळाला होता. 'देवमाणूस' मालिकेची क्रेझ आजही प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळते. झी युवा या चॅनलवर या मालिकेचा रिपीट टेलिकास्ट होत असतो. आता मात्र या मालिकेच्या चाहत्यांना या मालिकेचा नवा अध्याय पाहायला मिळणार आहे.



या मालिकेचा नवीन अध्याय अधिकच भन्नाट असणार आहे. नुकतेच झी मराठीने देवमाणूस (Devmanus) मालिकेच्या तिसऱ्या भागाची घोषणा केली आहे. याचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. चाहते मालिकेसाठी खूप उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.





मालिकेतील 'देवमाणूस' म्हणजे किरण गायकवाडने (Kiran Gaikwad) आपल्या भूमिकेने आणि अभिनयाने चाहत्यांना भुरळ घातली आहे. या मालिकेत त्याने खलनायकाची भूमिका साकारली आहे. 'देवमाणूस' मालिकेमुळे किरणला खूप लोकप्रियता मिळाली. दरम्यान आता नवीन सुरू होणाऱ्या 'देवमाणूस' मालिकेच्या नव्या अध्यायात कोण कलाकार पाहायला मिळणार याची अद्याप घोषणा झाली नाही. तसेच मालिकेची रिलीज डेटही समोर आली नाही.

Comments
Add Comment

Santacruz Chembur Link Road Phase 2 : सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज खुला; वाकोला-बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स प्रवास होणार अधिक वेगवान

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज,

Radhakrishna Vikhe Patil : धरण क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विकासासाठी सर्वेक्षण करणार

मुंबई : जलसंपदा विभाग आता मत्स्य व्यवसाय विकास विभागाशी सहक

Bike Rider Riddhi Thakkar: बाईक राइडिंगसाठी गेली, पण काळाने घात केला; मुंबईच्या 24 वर्षीय तरुणीचा भीषण अपघाती मृत्यू

मुंबई :  मुंबईतील (Mumbai) कांदिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात

Weather Update : महाराष्ट्रातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : राज्यात श्रावणाचं आगमन धो धो पावसानं होणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागांत गुरुवार १३ ते शनिवार १५ ऑगस्ट

Nitesh Rane : मच्छीमार बांधवांसाठी आधुनिक व सर्व सुविधांयुक्त वास्तू उभारणार – मंत्री नितेश राणे

· मरोळ मच्छी मार्केटच्या विकासकामांना गती देणार मुंबई, दि. 12: मुंबईतील मच्छीमार बांधवांसाठी महत्त्वपूर्ण

Water Metro : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी; वॉटर मेट्रोसह विविध प्रकल्पांना मिळणार गती

मुंबई : महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने अनेक