Monday, April 21, 2025
Homeताज्या घडामोडीDevmanus : तो 'देवमाणूस' परत येतोय

Devmanus : तो ‘देवमाणूस’ परत येतोय

मुंबई : मनोरंजनाच्या माध्यमातून जनजागृती करणे हा कलाकारांचा हेतू असतो. सत्य घटनेवर आधारित असलेल्या हातावर मोजण्याइतक्या मालिका असल्या तरी अशा मालिका प्रेक्षकांना भुरळ घालतात. अशाच एका मालिकेने काही वर्षांपुर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र त्या मालिकेतील पात्रांनी आणि मालिकेच्या संवादाने प्रेक्षकांची मने जिंकली. प्रेक्षकांच्या याच प्रेमामुळे या मालिकेचा नवीन अध्याय प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका दुसरी तिसरी कोणती नसून सर्वांची आवडती ‘देवमाणूस’ (Devmanus) आहे.

‘देवमाणूस’ मालिकेच्या आधी दोन भागात खेड्यातील डॉक्टरची कथा दाखवण्यात आली होती. खेड्यातील लोक डॉक्टरला देवमाणूस मानतात आणि त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि तो देवमाणूस कसा त्यांचा फायदा घेतो हे चित्रण त्यात पाहायला मिळते. ‘देवमाणूस’ मालिकेच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांकडून भरपूर प्रतिसाद मिळाला होता. ‘देवमाणूस’ मालिकेची क्रेझ आजही प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळते. झी युवा या चॅनलवर या मालिकेचा रिपीट टेलिकास्ट होत असतो. आता मात्र या मालिकेच्या चाहत्यांना या मालिकेचा नवा अध्याय पाहायला मिळणार आहे.

Swarget Bus Depot : स्वारगेट आगारातील ७२ निकामी भंगार बसेसचा होणार लिलाव

या मालिकेचा नवीन अध्याय अधिकच भन्नाट असणार आहे. नुकतेच झी मराठीने देवमाणूस (Devmanus) मालिकेच्या तिसऱ्या भागाची घोषणा केली आहे. याचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. चाहते मालिकेसाठी खूप उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

मालिकेतील ‘देवमाणूस’ म्हणजे किरण गायकवाडने (Kiran Gaikwad) आपल्या भूमिकेने आणि अभिनयाने चाहत्यांना भुरळ घातली आहे. या मालिकेत त्याने खलनायकाची भूमिका साकारली आहे. ‘देवमाणूस’ मालिकेमुळे किरणला खूप लोकप्रियता मिळाली. दरम्यान आता नवीन सुरू होणाऱ्या ‘देवमाणूस’ मालिकेच्या नव्या अध्यायात कोण कलाकार पाहायला मिळणार याची अद्याप घोषणा झाली नाही. तसेच मालिकेची रिलीज डेटही समोर आली नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -