Maharashtra ST : एसटीमध्ये पुन्हा वारी पर्व

  65

दोन बाय तीन आसनाच्या वारी बस लवकरच एसटीच्या ताफ्यात


मुंबई : २००५-०६ मध्ये एसटी महामंडळाने १२ मीटर लांबीची वारी बस सेवेत आणली होती.२ बाय ३ आसनप्रकार असलेल्या या बसला ६६ आसने होती.आता एसटी महामंडळ पुन्हा एकदा ३ ×२ साध्या बस सेवेत आणण्याची योजना आखत असून, ४ मार्च रोजी ३००० बसेसचे कस्टम टेंडर महामंडळाने काढले आहेत. वाढत्या प्रवाशांना तोंड देण्यासाठी पुन्हा या बस आणल्याने सध्या प्रवाशांना बसमध्ये मिळत असलेल्या सोयी मात्र कमी होणार आहे.त्यामुळे कालानुरूप बदल होत गेलेल्या एस.टी बस पुन्हा काही वर्षे मागे जाणार का असा सवाल प्रवाशांमधून विचारला जात आहे. काही वर्षांपूर्वी एसटीने लाल-पिवळा रंग बदलून संपूर्ण टोमॅटो लाल केला.रंगसंगतीसोबतच,महामंडळाने बसमधील आसने २×२ बनवण्यासाठी पाऊल उचलले,ज्यामुळे प्रवाशांच्या आरामदायी प्रवासाची व्याख्याच बदलून एक आमूलाग्र बदल झाला व प्रवाशी वाढले.बसचे ही अॅल्युमिनियम बांधकाम सोडून, एसटी २०१८ च्या सुमारास 'सौम्य स्टील' प्रकारात बनवू लागल्या,ज्यामुळे बसची रचना मजबूत होऊन प्रवासासाठी बस अधिक सुरक्षित झाली.या बसमध्ये अनेक बदल करून,महामंडळ,कंत्राटी आणि मालकीच्या बसेस आता एकाच प्रकारात सेवा देत आहेत. पण जेव्हा 'भारत ६' या बसेस सेवेत येऊ लागल्या तेव्हा महामंडळाने बसमध्ये एक पाऊल पुढे टाकून आमूलाग्र बदल केले.(Maharashtra ST)


सध्याच्या परिस्थितीत कंत्राटी साध्या बसेसमध्ये पुशबॅक सीट्स आणि प्रत्येक सीटला यूएसबी मोबाईल चार्जिंग देऊन,या साध्या बसेसची गुणवत्ता वाढवली आहे.ज्याप्रमाणे ट्रॅव्हल बसेस सेवा देतात,त्याचप्रमाणे एसटीने त्यांच्या साध्या बस सेवेत केलेला बदल खूप महत्त्वाचा होता आणि प्रवाशांनी देखील मोठ्या प्रमाणात त्याचे स्वागत केले. साध्या बसमध्ये ज्या सुविधा होत्या, त्याच सुविधा हिरकणी बसमध्ये सुद्धा देण्यात आल्या.त्यामुळे प्रवासीही वाढले आहेत.


साध्या दरात २×२ सेवा देणारी भारतातील एकमेव एसटी महामंडळ असताना,महामंडळाला पुन्हा ३×२ बसेस का घ्यायच्या आहेत याचे पहिले कारण म्हणजे सवलतीमुळे वाढलेली गर्दी,महिलांसाठी अर्धे तिकीट,तसेच ७५ वर्षांवरील नागरिकांसाठी मोफत एसटी प्रवास यामुळे एसटीमध्ये आता गर्दी वाढत आहे, परिणामी एसटी बसेस आणि अधिक जागांची गरज निर्माण झाली आहे.आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे, मागील नॉन-पुशबॅक (१२ मीटर) बसेसची आसन क्षमता ४५ पर्यंत असताना, नवीन अशोक लेलँड रेडीबिल्ट साध्या बसेसमध्ये तीच आसन क्षमता ५ वरून ४० पर्यंत घसरली आहे, म्हणजेच ५ जागांची घट झाली आहे, असे महामंडळाचे म्हणणे आहे. म्हणून तोटा कमी करण्यासाठी महामंडळ आता ३ बाय २ प्रकारच्या वारी बस घेणार आहे. मात्र त्यात पुश बँक व मोबाईल चार्जर नसेल . त्यामुळे या बस जर ठरावीक मध्यम किंवा स्थानिक मार्गावर न धावता लांब टप्य्याच्या मार्गावर धावल्यास प्रवाशाना योग्य त्या सोयी मिळू शकणार नाही.त्यामुळे प्रवासी नाराज होण्याची शक्यता आहे.(Maharashtra ST)

Comments
Add Comment

Hartalika 2025: अखंड सौभाग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी केले जाते हरतालिकेचे व्रत

मुंबई : हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी एक असलेला हरतालिका व्रताचा सण यंदा २६ ऑगस्ट २०२५ रोजी साजरा होत

Mumbai Police: मुंबई पोलिसांची कौतुकास्पद मोहीम, चोरीला गेलेले ८,००० मोबाईल परत मिळवून दिले

मुंबई: मुंबई पोलिसांनी चोरीला गेलेले मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली

GSB Ganpati First Look: मुंबईतील सगळ्यात श्रीमंत बाप्पाची पहिली झलक दिमाखात सादर

मुंबईच्या GSB सेवा मंडळाच्या बाप्पाच्या फर्स्ट लुकचे दिमाखात अनावरण  मुंबई: गणेश चतुर्थीसाठी आता एकच दिवस बाकी

Ganeshotsav 2025: वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने साकारले ५२ फूटी काशी विश्वनाथ मंदिर

मुंबई: दरवर्षी प्रसिध्द मंदिरांची हुबेहुब आरास साकारणाऱ्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘अरण्य’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच मराठी चित्रपट ‘अरण्य’ च्या पोस्टरचे अनावरण करण्यात

मुंबईत अंधेरीमध्ये पाच मजली मासळी बाजार बांधणार ?

मुंबई : मुंबईत अंधेरीमध्ये जे. बी. नगर येथे पाच मजली मासळी बाजार बांधण्याचा १३८ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरी