

grenade blast in Amritsar : मंदिराच्या आवारात स्फोट, तीन तरुणांना अटक
अमृतसर : पंजाबमधील अमृतसरमध्ये खंडवाला परिसरातील ठाकुरद्वार मंदिराच्या आवारात ग्रेनेडचा स्फोट झाला. या स्फोटामुळे मंदिराच्या भिंतींचे नुकसान झाले ...
व्हायरल व्हिडीओत तेज प्रताप यादव नशेत असल्याचे दिसत आहेत. ते बंगल्याच्या आवारातील मंचावर बसून पोलिसाला 'नाच नाही निलंबन करतो' असे सांगताना दिसत आहे. 'ए सिपाही, ए दीपक, एक गण बजाएंगे उसपे तुमको ठुमका लगाना है. बुरा मत मानो होली है. आज नहीं ठुमका लगाओगे तो सस्पेंड कर दिए जाओगे' हे तेज प्रताप यादव यांचे वाक्य आहे. तेज प्रताप हे बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचे पुत्र आणि विरोधी पक्षनेते तेजस्वी प्रसाद यादव यांचे सख्खे बंधू तसेच राष्ट्रीय जनता दलचे नेते आहेत.

Chhaava Box Office Collection : छावा चित्रपटाने महिन्याभरात केली एवढी कमाई
मुंबई : छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर आधारित छावा या हिंदी चित्रपटाने अवघ्या ३० दिवसांत ५४९.६७ कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाच्या ...
तेज प्रताप यांचा व्हिडीओ व्हायरल होताच भाजपा आणि जनता दल युनायटेडच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली. नेत्याने पोलिसाला नाचायला सांगणे हे चुकीचे असल्याचे भाजपा आणि जनता दल युनायटेडच्या नेत्यांनी सांगितले. आधी वडील कायदे त्यांच्या मर्जीने राबवत होते आता मुलगा तसे करताना दिसत आहे. जसा बाप तसा बेटा असा प्रकार सुरू असल्याची टीका भाजपा आणि जनता दल युनायटेडने केली. राष्ट्रीय जनता दलाचा जंगलराजवर विश्वास आहे. यामुळे ते सत्तेत आले तर कायदे धाब्यावर बसवण्याचेच प्रकार घडणार, अशी टीका भाजपाने केली. तर 'भानावर या तेज प्रताप यादव. सुधारला नाहीत तर कारवाई करावी लागेल. यादव कुटुंबातील वरिष्ठांनी तेज प्रताप यांना समजावून सांगावे'; या शब्दात जनता दल युनायटेडचे प्रवक्ते राजीव रंजन प्रसाद यांनी तेज प्रताप यादव यांना सुनावले.