Saturday, May 10, 2025

महामुंबईब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Central Railway Dadar Platform : मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील 'या' प्लॅटफॉर्मवरील ब्रिज ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार

Central Railway Dadar Platform : मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील 'या' प्लॅटफॉर्मवरील ब्रिज ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार

मुंबई : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक (४) ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे. मध्य रेल्वेच्या प्रवाशांना याचा फटका बसणार आहे.(Central Railway Dadar Platform)



मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेने दिलेल्या अधिकृत निवेदनानुसार दादर स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ च्या पुलाच्या उत्तरेकडील फूट ओव्हर ब्रिज (FOB) जिना दुरुस्तीच्या कामामुळे १५/१६ मार्च २०२५ च्या मध्यरात्रीपासून ते ३० एप्रिल २०२५ पर्यंत बंद राहणार आहे. लागोपाठ आलेल्या सुट्ट्यांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान मध्य रेल्वे प्रवाशांना या त्रासाला सामोरे जावं लागणार आहे.(Central Railway Dadar Platform)

Comments
Add Comment