मुंबई : रेल्वे प्रशासनाकडून (Railway Megablock) प्रत्येक रविवारी तांत्रिक बिघाड दुरुस्तीची किंवा इतर कामे हाती घेतली जातात. त्यामुळे रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येतो. यावेळी काही रेल्वेगाड्या रद्द केल्या जात असल्यामुळे रेल्वे प्रवाशांचा खोळंबा होत असल्याचे दिसून येते. अशातच उद्या रेल्वे प्रवास करणाऱ्यांचे हाल होणार आहेत. उद्या (दि.१६) रोजी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक (Railway Megablock) घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी उद्या रेल्वे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा असे आवाहन करण्यात आले आहे.
Maharashtra ST Bus : मुंबई सेंट्रल एसटी स्थानकातून लालपरी पुन्हा धावणार
ठाणे ते कल्याण आणि पनवेल ते वाशीदरम्यान मध्य रेल्वेने उद्या, रविवारी ब्लॉक घोषित केला आहे. ब्लॉक वेळेत रेल्वे रुळांसह सिग्नलची देखभाल-दुरुस्ती करण्यात येते. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहे.
मध्य रेल्वे
स्थानक – ठाणे ते कल्याण
वेळ – सकाळी १०.४० ते दुपारी ३.४०
मार्ग – अप आणि डाउन जलद
परिणाम – ब्लॉक वेळेत अप आणि डाउन जलद मार्गावरील लोकल अप आणि डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत. सीएसएमटी येथून ये-जा करणाऱ्या मेल-एक्स्प्रेसवर ही ब्लॉकचा परिणाम होणार आहे. यामुळे रविवारी सर्व रेल्वे फेऱ्या २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.
हार्बर रेल्वे
स्थानक – पनवेल ते वाशी
वेळ – सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५
मार्ग – अप आणि डाउन
परिणाम – ब्लॉक वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल / बेलापूर तसेच पनवेल ते ठाणे दरम्यान अप आणि डाउन मार्गावरील लोकल वाहतूक बंद राहणार आहेत. सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल धावणार आहेत. ठाणे ते वाशी / नेरुळ आणि बेलापूर / नेरुळ ते उरणदरम्यान लोकल फेऱ्या उपलब्ध राहणार आहेत.