मुंबई : बॉलीवूडची आदर्श जोडी म्हणून आलिया आणि रणबीर कपूरकडे (Ranbir Kapoor) बघितलं जात. या जोडीने पुन्हा एकदा चाहत्यांसमोर आदर्श उभा केला आहे. पत्नी आलियाचा वाढदिवस असतानाही रणबीरने मैत्रीचं नातं जपण्याला प्राधान्य दिलं. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जीचे वडील देब मुखर्जी यांनी वयाच्या ८३व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी आलिया आणि रणबीर जोडीने हजर राहिल्याचं पाहायला मिळालं.
Mumbai Holi Festival : मुंबईत धूलिवंदन सणाला गालबोट! भाईंदरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याला चाकूने भोसकले
आलियाचा आज (१५ मार्च ) वाढदिवस आहे. (Alia Birthday) मात्र आलिया आणि रणबीरने वाढदिवसाचं प्री सेलिब्रेशन १३ मार्च ला माध्यमांसोबत अलिबाग येथे केले. त्यानंतर रणबीरला अयान मुखर्जीच्या वडिलांची निधनाची बातमी समजल्यानंतर त्याने तडक मुंबई गाठली. अयान मुखर्जीच्या वडीलांचे निधन १४ मार्चला झाले. मुंबईला येताच रणबीर आणि आलिया अयान मुखर्जीच्या घरी गेले. तेव्हा अयानच्या घरी त्याच्या वडिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येणाऱ्या कलाकारांना रणबीर भेटताना दिसला. बॉलिवूडचे अनेक कलाकार अयान मुखर्जीच्या घरी आले होते. यात करण जोहर, जया बच्चन, सलीम खान अशा अनेक सेलिब्रिटींचा समावेश होता.(Alia Birthday)
अयान सोबत रणबीरने देब मुखर्जी यांच्या पार्थिवाला खांदा दिल्याचे फोटो सोशल माध्यमांवर व्हायरल होत आहेत. दरम्यान बायकोचा वाढदिवस असतानाही रणबीरने मैत्रीला प्राधान्य दिले. रणबीरच्या या कृतीवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.