Thursday, January 15, 2026

महिलेच्या हत्येचे गूढ उकलले

महिलेच्या हत्येचे गूढ उकलले
विरार(प्रतिनिधी): मांडवी पोलीस स्टेशनच्या हद्दीत होळीच्या दिवशी महिलेचे छाटलेले मुंडके सापडल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणाचा पोलिसांनी २४ तासात उलगडा केला असून कौटुंबिक वादातून पतीनेच पत्नीची हत्या केल्याची माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे अविनाश अंबुरे यांनी दिली आहे.
विरारच्या मांडवी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या विरार फाटा परिसरामध्ये महिलेचे छाटलेले मुंडके असलेली सुटकेस काही लोकांना गुरुवारी दिसून आली. याबाबत त्यांनी मांडवी पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळावरून महिलेचे छाटलेले मुंडके ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला. मुंडके असलेल्या सुटकेस मध्येच सराफा दुकानाचे नाव असलेले पाकीट पोलिसांना मिळाले. या पाकिटापासून सुरू झालेला तपास आरोपीला शोधण्यापर्यंत पोहचला.
नालासोपारा मधील रहमत नगर राहणाऱ्या हरीश हिप्परगी यानेच आपली पत्नी उत्पला दास हिची ८ जानेवारी रोजी गळा आवळून हत्या केली. त्यानंतर पत्नीचा गळा आणि धड वेगळे केले. छाटलेले मुंडके मुंबई अहमदाबाद मार्गावर सुटकेस मध्ये टाकून फेकले तर धड प्रगती नगर मधील नाल्यात फेकल्याची कबुली आरोपीने दिली आहे. सदर महिला ही पश्चिम बंगाल मधील असून, आपल्या मुलांसोबत ती पश्चिम बंगालमध्ये राहण्यासाठी जाणार होती, यावरुनच पती -पत्नी मध्ये खटके उडत होते. याच रागातून पतीने पत्नीची हत्या केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा