Monday, June 23, 2025

Post Office Scheme : ५००० गुंतवा ८ लाख मिळवा; पोस्ट ऑफिसने काढली नवी योजना!

Post Office Scheme : ५००० गुंतवा ८ लाख मिळवा; पोस्ट ऑफिसने काढली नवी योजना!

मुंबई : प्रत्येक सर्वसामान्य माणूस आपल्या भविष्यासाठी विविध योजनांमध्ये पैसे गुंतवत असतो. भारतीय पोस्ट ऑफिस (Post Office) नेहमीच आकर्षक व्याजदरासह नवीन-नवीन स्कीम आणत असते. आता अशीच एक नवीन स्कीम पोस्ट ऑफिसने काढली आहे. ज्यामुळे भन्नाट परतावा मिळणार आहे. जाणून घ्या काय आहे नेमकी योजना. (Post Office Scheme)



पोस्ट ऑफिसने 'रिकरिंग डिपॉझिट योजना' (Recurring Deposite) सुरु केली आहे. मुळात ही योजना दोन वर्ष आधीपासूनच सुरु करण्यात आली आहे. या योजनेतील व्याजदर बदलत असते. या योजनेत ६.७ टक्के व्याज मिळते. त्यानुसार या योजनेत जर तुम्ही दर महिन्याला ५००० रुपये गुंतवले तर ८ लाख रुपये मिळवू शकतात. या योजनेत मॅच्युरिची कालावधी पाच वर्षांचा आहे. म्हणजेच तुम्ही ३ लाख रुपये जमा करणार आहेत. त्यात ६.७ टक्के व्याजदर पकडले तर ५६,८३० रुपये मिळणार आहे. म्हणून एकूण तुम्हाला ३,५६,८३० रुपये मिळणार आहेत.


दरम्यान, या योजनेत जर तुम्ही अजून पाच वर्ष गुंतवणूक केली तर चांगला परतावा मिळणार आहे. तुम्ही १० वर्षासाठी ६ लाख रुपये गुंतवणार आहेत. यावर तुम्हाला २,५४,२७२ रुपये मिळणार आहेत. या योजनेत १० वर्षांनी तुमचे ८,५४,२७२ रुपये मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन अर्ज करु शकतात. या योजनेत तुम्ही १०० रुपयांपासून गुंतवणूक करु शकता. या योजनेत तुम्हाला चांगले व्याजदर मिळते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >