नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते असलेले काँग्रेस खासदार राहुल गांधी वारंवार व्हिएतनामला का जातात ? असा प्रश्न भाजपाकडून उपस्थित करण्यात आला आहे. राहुल गांधी २०२५ या वर्षात आतापर्यंत दोन वेळा व्हिएतनामला जाऊन आले आहेत.
Senior BJP Leader Shri @rsprasad addresses press conference at BJP Headquarters, New Delhi. https://t.co/YWkumsU57F
— BJP (@BJP4India) March 15, 2025
grenade blast in Amritsar : मंदिराच्या आवारात स्फोट, तीन तरुणांना अटक
माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचा मृत्यू (२६ डिसेंबर २०२४) झाला त्यावेळी राहुल गांधी व्हिएतनाममध्येच होते. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याचा मृत्यू झाला तरी त्यांना तातडीने मायदेशी परतावे असे वाटले नाही. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाही राहुल गांधी व्हिएतनामला गेल्याचे कानावर आले. आता पुन्हा राहुल गांधी व्हिएतनामला गेले आहेत. खासदार असूनही राहुल गांधी स्वतःच्या मतदारसंघात जाण्याऐवजी वारंवार व्हिएतनामला जात आहेत. राहुल गांधींना व्हिएतनामविषयी एवढे प्रेम का ? असा प्रश्न भाजपा नेते रवीशंकर प्रसाद यांनी उपस्थित केला आहे.
Chhaava Box Office Collection : छावा चित्रपटाने महिन्याभरात केली एवढी कमाई
भाजपाने प्रश्न विचारताच काँग्रेसने सावध पवित्रा घेतला. जास्त माहिती देणे टाळत राहुल गांधी व्हिएतनामच्या आर्थिक प्रगतीचा अभ्यास करत आहेत, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिश रावत म्हणाले. व्हिएतनामने केलेल्या प्रयोगांपैकी काही प्रयोग भारतात शक्य आहेत का याचाही अंदाज राहुल गांधी घेत असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले.