धुळे : नंदुरबारमधील (Nandurbar) धडगाव तालुक्यात एक विलक्षण प्रकार घडल्याचे समोर आले आहे. होळीला माहेरी आलेल्या एका महिलेचे दोन महिन्यांचे बाळ उलट्या आणि अति रडण्याने निपचित पडले होते. बाळ काहीच हालचाल करत नसल्यामुळे घरच्या लोकांना बाळाचा मृत्यू झाल्याचे वाटल्याने महिलेच्या माहेरी आणि सासरी रडारड सुरू झाली. मात्र अशातच डॉक्टरांच्या रुपाने आलेल्या देवदूताने केलेल्या एका कृतीमुळे बाळ जिवंत झाले. या घटनेमुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला असून हसरे वातावरण निर्माण झाले आहे.
धडगाव तालुक्यातील तेलखेडी येथे राहणाऱ्या मिनाबाई सचिन पावरा ही महिला तिच्या दोन महिन्यांच्या बाळासह होळीसाठी आपल्या माहेरी गेली होती. माहेरी गेल्यावर बाळाची तब्येत बिघडली. उलट्या होऊन बेजार झालेले बाळ दूधही पीत नव्हते आणि बाळ निपचित पडले होते. त्याचबरोबर बाळाचा श्वासोच्छ्रुासही बंद पडला होता. बाळ कुठलीही हालचाल करत नसल्यामुळे परिवाराकडून राडाराडा सुरू झाली आणि अंत्यविधीची ही तयारीला सुरुवात झाली होती. मात्र परिवारातील नातेवाईकांनी नजीकच्या आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच डॉक्टर घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी आपला अनुभव वापरत बाळाच्या पायाला टिचकी मारली आणि बाळ हालचाल करत श्वास घ्यायला लागले.
त्यानंतर बाळाला धडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सलाईन लावल्यानंतर बाळ नियमित श्वास घ्यायला लागले. सध्या बाळाची प्रकृती ठणठणीत असून, दोन दिवसांनी त्याला डिस्चार्ज दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. डॉक्टरांच्या रुपाने देवदूतच आयुष्यात आला आणि बाळाला नवं जीवन देऊन गेला अशी भावना गावकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…
बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या…
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…