Friday, May 9, 2025

कोकणताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Savarde Holi : सावर्डे येथील अंगावर जळकी लाकडं फेकण्याची परंपरा नेमकी काय ?

Savarde Holi : सावर्डे येथील अंगावर जळकी लाकडं फेकण्याची परंपरा नेमकी काय ?

कोकण : सर्वत्र होळी उत्सव थाटामाटात आनंदाने साजरा केला जात आहे. या सणाला कोकणात अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोकणात सगळीकडे शिमगोत्सव वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. काही ठिकाणी होळी धुलीवंदनाच्या आदल्या दिवशी दहन केली जाते तर काही ठिकाणी धुलीवंदनाच्या दिवशी होळी भोवती ग्रामस्थ देवीची पालखी नाचवून होळी दहन केली जाते. मात्र रायगड जिल्ह्यातील महाड शहरात तसेच रत्नागिरी तालुक्यातील सावर्डे गावात होळीची हटके प्रथा पूर्वापार चालत आली आहे.



सावर्डे गावात देव दानव युद्धाची परंपरा आहे. यालाच 'होल्टे होम' असेही म्हटले जाते. सालाबादप्रमाणे होळी दहन केली जाते. व नंतर दोन गटांमध्ये म्हणजेच देव आणि दानव युद्ध सुरू होते. सर्व ग्रामस्थ एकमेकांच्या अंगावर जळके लाकूड फेकून ही परंपरा कायम करून होळी उत्सव सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. पूजा केल्यानंतर होम लावल्यानंतर जळकी लाकडं एकमेकांच्या अंगावर फेकण्याची परंपरा यालाच देव दानवाचे युद्ध असे म्हटले जाते. होमच्या दोन्ही बाजूला दोन्ही बाजूकडील रहिवासी एकत्र येतात. आणि हातातील पेटतं लाकूड समोरील रहिवाशांच्या अंगावर फेकतात. शेकडो पेटती लाकडं एकमेकांच्या अंगावर फेकली जातात. या युद्धात कोणालाही भाजत नाही. अथवा कोणीही जखमी होत नाही हे विशेष आहे. हा खेळ पहाण्यासाठी नागरिक गर्दी करत असतात.



यातील देव दानव कोण असणार हे कसं ठरत??


होळीसाठी वस्तूरुपी ठेवलेला प्रसाद आळीतील एक विशिष्ट गट होळी लागताच पळवतो. त्यामुळे आळीतील दुसऱ्या गटाला हा प्रसाद मिळत नाही. म्हणून प्रसाद घेऊन गेलेला गट दानव होतो, तर प्रसाद न मिळालेला गट देव. यानंतर या दोन्ही गटामध्ये युद्धास सुरवात होते. हे दोन्ही गट एकमेकांवर होळीमधील जळती लाकडं फेकतात आणि गेल्या अनेक वर्षांपासूनची युद्ध स्वरूप प्रथा पार पडते. अशाप्रकारे आजपर्यंत परंपरेने चालत आलेली प्रथा कायम आहे. विशेषतः तरुण मंडळी हुरहुरीने यामध्ये सहभागी होतात.

Comments
Add Comment