Friday, March 28, 2025
Homeब्रेकिंग न्यूजJay Pawar Wedding : पवारांच्या घरात वाजणार सनई चौघडे, लवकरच होणार नव्या...

Jay Pawar Wedding : पवारांच्या घरात वाजणार सनई चौघडे, लवकरच होणार नव्या सुनेचे आगमन

मुंबई : एकीकडे जगभरात होळीचे रंग विखुरलेले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरी सनई चौघड्यांचा सूर दुमदुमणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar ) यांचे धाकटे चिरंजीव लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याची बातमी समोर आली आहे. जय पवारांच्या आत्याबाई आणि शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule ) यांनी भाच्याचे आणि होणाऱ्या सुनेचे फोटो सोशल माध्यमांवर पोस्ट केले आहेत.

Earthquake : कारगिल ते अरुणाचल प्रदेश हादरलं!

जय पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव आहेत. जय पवार सक्रिय राजकारणात नसले, तरीही राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर स्थानिक पातळीवर राजकारणात त्यांनी लक्ष घालण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर आता जय पवार लग्नामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. जय पवार यांच्या होणाऱ्या पत्नीचे नाव ऋतुजा पाटील आहे. लवकरच या दोघांची लग्नगाठ बांधण्यात येणार असून पवार कुटुंबात सनई चौघडे वाजू लागले आहेत. दरम्यान या लग्नाचे पडसाद राजकीय कारकिर्दीवर पडतील का ? हे पाहणे महत्त्वाचं ठरेल

कोण आहे जय पवार यांची पत्नी ?

सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे प्रवीण पाटील यांची कन्या ऋतुजा पाटील (rutuja patil) यांच्यासोबत अजित पवारांचे पुत्र जय यांचा विवाह होणार आहे. जय पवार आणि ऋतुजा पाटील हे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांच्या संपर्कात होते. आता त्यांनी लग्नाच्या बेडीत अडकण्याचा निर्णय घेतला आहे. ऋतुजा पाटील यांची बहीण ही केसरी टूर्सच्या पाटील कुटुंबाची सून आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -