Friday, May 9, 2025

महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

सतीश भोसले उर्फ खोक्याला पोलीस कोठडी

सतीश भोसले उर्फ खोक्याला पोलीस कोठडी
बीड : बीड जिल्ह्यातील शिरुरमध्ये घडलेल्या अमानुष मारहाण प्रकरणातील आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसले याला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. सतीश भोसले याच्यावर राजकीय वरदहस्त असल्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे.



सतीश उर्फ खोक्या भोसलेने केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला. यानंतर सतीशवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली. पण तोपर्यंत सतीश फरार झाला होता. अखेर त्याला उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथून अटक करण्यात आली. उत्तर प्रदेश पोलीस आणि बीड पोलीस यांनी संयुक्त कारवाई करुन सतीश उर्फ खोक्या भोसलेला अटक केली. पोलिसांनी प्रयागराज न्यायालयातून हस्तांतरणाची कोठडी मागून घेतली. यानंतर बीड पोलिसांनी सतीश उर्फ खोक्या भोसले याला बीड जिल्ह्यातील शिरूर सत्र न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोन्ही बाजू जाणून घेतल्या. यानंतर न्यायालयाने तपासाकरिता आवश्यक म्हणून सतीश उर्फ खोक्या भोसले याला सात दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.

 
Comments
Add Comment