Friday, May 9, 2025

महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

रेल्वेचे गेट तोडून ट्रक आला रुळांवर, भरधाव मुंबई-अमरावती एक्सप्रेसला धडकला

रेल्वेचे गेट तोडून ट्रक आला रुळांवर, भरधाव मुंबई-अमरावती एक्सप्रेसला धडकला
जळगाव : पहाटे चारच्या सुमारास बोदवड जवळ मुंबई-अमरावती एक्सप्रेसला अपघात झाला. मालाने भरलेला ट्रक वेगाने आला. रेल्वेचे गेट तोडून ट्रक थेट रुळांवर आला. सुसाट रुळांवर आलेल्या ट्रकने भरधाव येणाऱ्या मुंबई-अमरावती एक्सप्रेसला धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि अधिकारी घटनास्थळी पोहोचले. स्थानिकांनी पोलीस आणि रेल्वे प्रशासनाच्या सहकार्याने मदतकार्य सुरू केले. अपघातात जीवितहानी झालेली नाही. रेल्वेच्या तंत्रज्ञांनी तातडीने कारवाई केली आणि सकाळी ७.५० पर्यंत रेल्वेची वाहतूक सुरळीत केली.





अपघात होताच ट्रकचालक घटनास्थळावरुन पळून गेला. पोलीस ट्रकच्या चालकाचा शोध घेत आहेत. अपघातामुळे काही तास रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला होता. मुंबई - हावडा मार्गावर जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व ट्रेनची वाहतूक मंदावली होती.
Comments
Add Comment