
मुंबई : बॉलिवूड मधील प्रसिद्ध आदर्श जोडी म्हणून आलिया भट्ट आणि रणबीर कपूरकडे पाहिलं जातं. (Alia Bhatt Birthday) या दोघांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. हे जोडपं नेहमीच चर्चेत असतं. आलिया आणि रणबीरच्या मुलीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. नेटकरीही त्याला उदंड प्रतिसाद देत असतात. सध्या हे जोडपं एका रोमँटिक व्हिडीओमुळे चर्चेत आलं आहे.
येत्या १५ मार्चला आलिया तिचा ३२ वा वाढदिवस साजरा करणार आहे. हा वाढदिवस ती तिच्या अलिबाग येथे खरेदी केलेल्या बंगल्यावर करणार आहे. तत्पुर्वी आलिया आणि तिचा नवरा रणबीरने प्रसारमाध्यमांबरोबर काल (दि १३) प्री बर्थडे साजरा केला. ( Alia Bhatt Birthday ) अभिनेत्रीने केक कापला, त्यानंतर रणबीरला केक भरवला. दोघांमधले हे गोड क्षण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र, रणबीरने केलेल्या खास कृतीने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या भूमिकेत तेजस बर्वे मुंबई: अध्यात्म, ज्ञान आणि भक्तीचा संगम म्हणजे कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ श्री ...
आलियाने केक कापल्यावर रणबीरने पत्नीला जवळ घेऊन तिला फोरहेडवर किस केल्याचं पाहायला मिळालं. यानंतर गंमत म्हणून त्याने आलियाच्या नाकावर केक लावला. या कार्यक्रमादरम्यान रणबीर सतत आलियाची काळजी करताना दिसला. आलिया-रणबीरने पापाराझींबरोबर एकत्र फोटो देखील काढले. यावेळी आजूबाजूला सगळे पापाराझी असल्याने आलियाने रणबीरच्या मांडीवर बसून फोटोसाठी पोझ दिल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये आलिया गोड हसून सर्वांशी प्रेमाने संवाद साधत असल्याचं पाहायला मिळत आहे.
आलिया आणि रणबीरचा हा साधेपणा नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. दरम्यान आता रणबीर आलियाला तिच्या ३२व्या वाढदिवसानिमित्त अजून काय सरप्राईज देतो याकडे चाहत्यांच लक्ष लागलं आहे.