

सतीश भोसले उर्फ खोक्याला पोलीस कोठडी
बीड : बीड जिल्ह्यातील शिरुरमध्ये घडलेल्या अमानुष मारहाण प्रकरणातील आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसले याला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली ...
छत्तीगडमधील नक्षलवाद प्रभावी भागांमध्ये सध्या निया नेल्लानार ही सरकारी योजना सुरू आहे. निया नेल्लानार म्हणजे 'आपले चांगले गाव'. या योजनेला सकारात्मक प्रतिसाद देत बीजापूर जिल्ह्यातील गंगालूर भागात सक्रीय असलेल्या १७ नक्षलवाद्यांनी शरण येण्याचा निर्णय घेतला. शरण आलेल्यांमध्ये दिनेश मोडियम (३६) आहे. दिनेश मोडियम हा माओवादी नक्षलवाद्यांचा डिव्हिजनल कमिटी मेंबर होता. बीजापूर जिल्ह्यातील २६ प्रकरणांमध्ये तपास पथक दिनेश मोडियम याला शोधत होते. त्याच्यावर आठ लाख रुपयांचे बक्षिस लावण्यात आले होते. दिनेशच्या दोन्ही पत्नी, ज्योती टाटी उर्फ काला मोडियम (३२) आणि दुला करम (३२) या दोघी एरिया कमिटी मेंबर होत्या. या दोघींवर प्रत्येकी ५ लाख रुपयांचे बक्षिस लावण्यात आले होते.

Jay Pawar Wedding : पवारांच्या घरात वाजणार सनई चौघडे, लवकरच होणार नव्या सुनेचे आगमन
मुंबई : एकीकडे जगभरात होळीचे रंग विखुरलेले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरी सनई चौघड्यांचा सूर ...
शरण आलेल्या नक्षलवाद्यांना सरकारी योजनेनुसार २५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. तसेच त्यांना मुख्य प्रवाहात सहभागी करुन घेतले जाईल. यंदाच्या वर्षी बीजापूर जिल्ह्यात आतापर्यंत ६५ नक्षलवादी शरण आले आहेत. याआधी मागच्या वर्षी बस्तरमध्ये ७९२ नक्षलवादी शरण आले होते.
नक्षलवाद्यांच्या शरणागतीचा कार्यक्रम स्थानिक पोलीस तसेच डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड, बस्तर फायटर्स, स्पेशल टास्क फोर्स, सीआरपीएफ, कोब्रा बटालियन यांच्या उपस्थितीत झाला.