Thursday, April 17, 2025
Homeदेशभाषावाद पेटला, तामीळनाडूने अर्थसंकल्पातून '₹' चिन्ह काढून टाकले, त्याऐवजी 'ரூ' चिन्ह लावले

भाषावाद पेटला, तामीळनाडूने अर्थसंकल्पातून ‘₹’ चिन्ह काढून टाकले, त्याऐवजी ‘ரூ’ चिन्ह लावले

चेन्नई : तामीळनाडू आणि केंद्र सरकार यांच्यात सुरू असलेला तामीळ विरुद्ध हिंदी हा भाषावाद आणखी तीव्र झाला आहे. तामीळनाडूत द्रमुक (इंडी आघाडी) सत्तेत आहे तर केंद्रात भाजपाच्या (एनडीए) नेतृत्वातले सरकार आहे. द्रमुक सरकारने भाषावादात स्वतःची भूमिका आणखी कठोर केली आहे. तामीळनाडूतील स्टॅलिन सरकारने राज्याच्या शुक्रवारी १४ मार्च रोजी जाहीर होणार असलेल्या २०२५ – २६ च्या अर्थसंकल्पातून ‘₹’ चिन्ह काढून टाकले आणि त्याऐवजी ‘ரூ’ हे चिन्ह वापरले आहे.

भारताने पकडला अमेरिकेचा मोस्ट वाँटेड आरोपी

नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात त्रिभाषिक सूत्राद्वारे राज्यावर हिंदी लादल्याच्या आरोप करणाऱ्या तामीळनाडूतील द्रमुक सरकारने रुपयाचे चिन्ह बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे तामीळनाडू हे देशातील पहिले राज्य झाले आहे जिथे रुपयाचे चिन्ह बदलण्यात आले आहे. स्टॅलिन सरकारने अद्याप अर्थसंकल्पातील बदल या विषयावर अधिकृत भाष्य केलेले नाही. पण भाजपाने तामीळनाडू सरकारच्या कृतीवर टीका केली आहे. द्रमुकच्या नेतृत्वातील तामीळनाडू सरकारची कृती ही भारतापासून वेगळे असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाने दिली. भाषावाद निर्माण करुन द्रमुक स्वतःच्या अपयशांकडून सर्वांचे लक्ष दुसरीकडे वेधू इच्छिते, अशीही शक्यता भाजपाने व्यक्त केली. तर तामीळ भाषेला प्राधान्य देण्यासाठी अर्थसंकल्पातून ‘₹’ चिन्ह काढून टाकले आणि त्याऐवजी ‘ரூ’ हे चिन्ह वापरले आहे, असे द्रमुकचे नेते सरवनन अन्नादुराई म्हणाले. त्यांनी तामीळनाडू सरकारच्या कृतीत काहीही बेकायदा नसल्याचा दावा केला.

सोन्याची तस्करी करण्यासाठी यू ट्युबवरुन घेतले धडे, अभिनेत्री रान्या रावने दिली कबुली

तामीळनाडूत २०२६ मध्ये निवडणूक होणार आहे. अनेक वर्षांपासून राज्यात मुख्य लढत द्रमुक विरुद्ध अण्णाद्रमुक अशी आहे. पण भाजपा मागील काही काळापासून राज्यात पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. ताजा भाषावाद निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून निर्माण केल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -