Friday, March 28, 2025
Homeक्रीडाशुभमन गिल फेब्रुवारीचा ICC प्लेयर ऑफ द मंथ

शुभमन गिल फेब्रुवारीचा ICC प्लेयर ऑफ द मंथ

दुबई : टीम इंडियाचा चॅम्पियन आणि उपकर्णधार शुभमन गिल फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने फेब्रुवारी प्लेयर ऑफ द मंथची नुकतीच घोषणा केली. शुभमन गिल व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ आणि न्यूझीलंडचा ग्लेन फिलिप्स शर्यतीत होते. या दोघांना धोबीपछाड देत शुभमन गिलने पुरस्कारावर नाव कोरले आहे.

ICC ranking : आयसीसीच्या रँकिंगमध्ये भारताचे अव्वल स्थान कायम

शुभमन गिलने महिन्याभरात पाच एकदिवसीय सामन्यांमध्ये ९४.१९ च्या स्ट्राईक रेटसह १०१.५० च्या सरासरीने ४०६ धावा केल्या आहेत. त्यासाठी त्याला प्लेयर ऑफ द मंथचा पुरस्कार मिळाला आहे. इंग्लंड विरुद्धच्या नागपूर वनडेत त्याने ८७ धावांची खेळी केली. त्यानंतर कटकमध्ये त्याने आपल्या कामगिरीतील सातत्य कायम राखत ६० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. अहमदाबादच्या मैदानात शुभमन गिलने शतकी खेळी केली. इंग्लंड विरुद्धच्या अखेरच्या वनडे सामन्यात त्याने १०२ चेंडूंत ११२ धावांची खेळी केली होती. या शतकी खेळीत त्याने १४ खणखणीत चौकारांसह ३ उत्तुंग षटकार मारले.

Shreyas Iyer : तो भारताचा सर्वात विश्वासार्ह एकदिवसीय फलंदाज-अनिल कुंबळे

आपला फॉर्म कायम राखत चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील दोन लढतीतही शुभमन गिलने आपल्या बॅटिंगचा फर्स्ट क्लास शो दाखवून दिला.आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील बांगलादेशविरुद्धच्या सलामीच्या लढतीत शुभमन गिलनं नाबाद १०१ धावांची खेळी केली होती. त्यानंतर पाकिस्तान विरुद्धच्या लढतीत त्याने ४६ धावा केल्या. या सामन्यात त्याचे अर्धशतक हुकले पण ही खेळी टीम इंडियाला विजयी सिलसिला कायम ठेवण्यासाठी उपयुक्त ठरली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -