सिंधुदुर्ग : मालवण येथील खोल समुद्रात सुमारे १९ हजार १३१. ७२ चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर नवीन खनिज तेलसाठे सापडले आहेत. नव्याने झालेल्या संशोधनात मालवणबरोबरच पालघर जिल्ह्याच्या सागरी कक्षेतही तेलसाठे सापडले आहे. संबंधित क्षेत्रात केंद्रीय तेल उत्पादन कंपन्या लवकरच संशोधनाद्वारे उत्खनन करणार आहे. तर या सगळ्या संशोधनाबाबत स्थानिक प्रशासन मात्र अनभिज्ञ आहे.
समुद्रातील खनिज तेलसाठ्यांबाबत भारतात दिर्घकाळ संशोधन सुरु आहे. याचाच भाग म्हणून गेली आठ वर्षे अरबी समुद्रात संशोधन सुरु होते. यात आता १८ हजार चौरस किलोमीटर क्षेत्रफळाहून अधिक क्षेत्रात खनिज तेलाचे नवे साठे समोर आले आहेत. पालघरमधील डहाणूच्या समुद्रात ५३३८ आणि सिंधुदुर्गजवळील मालवण समुद्रात १९ हजार १३१ चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर हे तेलसाठे आहेत. हे साठे उथळ समुद्रात आहेत. त्यांचे किनाऱ्यापासूनचे अंतर ८६ सागरी मैल इतके आहे. त्या ठिकाणी केंद्रीय तेल उत्पादन कंपन्या लवकरच संशोधनाद्वारे उत्खनन करणार आहेत.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रामध्ये तेलसाठे आढळल्याबाबत जिल्हा प्रशासनाने अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही. मालवणच्या खोल समुद्रात नवीन तेलसाठे सापडले असल्याची माहिती मिळाली आहे; मात्र, संबंधित विभागाकडून आपल्याकडे याबाबत कोणताही अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. याबाबतची अहवाल मिळताच सविस्तर माहिती प्रसार माध्यमांना दिली जाईल, असे वर्षा झालटे, तहसीलदार, मालवण यांनी सांगितले आहे.
अरबी समुद्रात तेलसाठ्यांसाठी अनेक वर्षे संशोधन सुरु आहे. मुंबईपासून ७५ सागरी मैल अंतरावर १९७४ मध्ये ‘बॉम्बे हाय’ या ठिकाणी खनिज तेलाचा साठा सापडला होता. त्या ठिकाणाहून सध्या तेल उत्खनन होत आहे. आताच्या या नव्या संशोधनामुळे महाराष्ट्रात तेल उत्पादन क्षेत्रात खूप मोठी भर पडेल.तसेच भारतातील तेल उत्पादन चार पटीने वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.या संशोधन व उत्खनन कार्याला गती देण्यासाठी केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. या नवीन साठ्यामुळे अर्थव्यवस्थेला साहाय्य होण्यास मदत होणार आहे.
यमुंबई: इंडियन प्रीमियर लीगमधील ३२व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना सुपर ओव्हरपर्यंत…
मुंबई : येत्या काही दिवसांत मुंबईकरांना उष्णतेसह वाढत्या आर्द्रतेचा तडाखा सहन करावा लागण्याची शक्यता आहे.…
मुख्यमंत्री फडणवीसांची शेतकऱ्यांना भावनिक साद अमरावती : विदर्भातील अमरावती येथे विमानतळाचे लोकार्पण केल्यानंतर विदर्भातील प्रकल्पग्रस्त…
मुंबई : नॅशनल हेराल्डची मालमत्ता हडपणा-या काँग्रेसच्या आंदोलनाला भाजपाचा कडवा विरोध असून काँग्रेसचे हे आंदोलन…
मुंबई : लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बसेस थांबत असलेल्या हॉटेल-मोटेल थांब्यावर प्रवाशांना आरोग्यदायी आणि किफायतशीर…
मुंबई : आगामी काळात रायगड जिल्ह्यात भाजपा शतप्रतिशत होणार असा विश्वास भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र…