होळी आणि धूलिवंदनासाठी मुंबईत ११ हजार पोलिसांचा बंदोबस्त

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात गुरुवार १३ मार्च २०२५ रोजी होळी (होलिकोत्सव) आणि शुक्रवार १४ मार्च २०२५ रोजी धूलिवंदन हे सण साजरे होणार आहेत. रमझान महिना पण सुरू आहे. तसेच गुरुवारी पारशी आबान महिन्याची सुरुवात होत आहे. या काळात कायदा - सुव्यवस्था राखण्यासाठी देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत ११ हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अठराशे अधिकारी आणि नऊ हजारांपेक्षा जास्त कर्मचारी यांचा यात समावेश आहे. संवेदनशील ठिकाणी पोलीस बारकाईने लक्ष ठेवणार आहेत.



मुंबईत गृहनिर्माण संस्था, उत्सव मंडळं, बैठ्या चाळी तसेच नाक्यानाक्यांवर होलिकोत्सव साजरा केला जातो. उत्सवाच्या नियोजनानुसार गुरुवारी संध्याकाळी होळ्या पेटवल्या जातील आणि शुक्रवारी धूलिवंदन साजरे केले जाईल. मुंबईसह अनेक शहरांमध्ये धूलिवंदनाच्या दिवशीच रंग खेळण्याची पद्धत प्रचलित झाली आहे. रंगपंचमीसाठी अनेक शहरांतील कार्यालयांमधून सुटी दिली जात नाही. यामुळे धूलिवंदनाच्या दिवशीच रंग खेळण्याची पद्धत प्रचलित झाली आहे. धूलिवंदनाच्या दिवशी आबालवृद्ध रंग खेळतात. या काळात समाजकंटकांकडून गैरप्रकार करुन उत्सवाला गालबोट लावण्याचा प्रयत्न होऊ नये यासाठी मुंबईत पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अनेकदा धूलिवंदनाच्या दिवशी छेड काढणे, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, अश्लील शेरेबाजी असे प्रकार घडतात. जातीय तेढ निर्माण होते. हे टाळण्यासाठी आणि सलोखा राखण्यासाठी पोलीस खबरदारी घेणार आहेत. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.



मुंबईतील चौपाट्या, गर्दीच्या ठिकाणी सतत गस्त सुरू राहील. संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त असेल. मद्यपी वाहन चालक, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या व्यक्ती, महिलांशी गैरवर्तवणूक करणारे, अमली पदार्थाची विक्री तसेच सेवन अशा सर्व बेकायदा कृत्यांना आळा घालण्यासाठी पोलीस सज्ज आहेत. बेकायदा कृत्य करताना आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. ड्रंक अँड ड्राइव्ह मोहिमेसाठी ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात येणार आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करुन सण उत्साहात साजरा करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.



मुंबईत बंदोबस्तासाठी सात अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वात १९ पोलीस उपायुक्त, ५१ सहायक पोलीस आयुक्त, १७६७ पोलीस अधिकारी, ९१४५ अंमलदार, राज्य राखीव पोलिसांच्या तुकड्या, शीघ्र कृती दलाची पथके, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, श्वान पथक, गृहरक्षक दलाचे जवान कार्यरत असतील.
Comments
Add Comment

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री

मुंबईत दुपारी दीड वाजेपर्यंत २९.९६ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान सुरू आहे.

मुंबईच्या इस्लामीकरणाचे षडयंत्र ‘टीस’च्या अहवालातून उघड

मुंबई  : २०५१ पर्यंत मुंबईतील हिंदू लोकसंख्या केवळ ५४ टक्के उरेल, अशी धक्कादायक माहिती देशातील अग्रगण्य टाटा