
किमतीमध्ये पाच रुपयांची वाढ; खवय्यांकडून सर्वाधिक खरेदी
मुंबई : होळी (Holi Festival) म्हटली की तुपाच्या धारेसोबत गरम पुरणपोळीची (Puranpoli) आठवण येते. होळीला पुरणपोळीचा नैवेद्या लागतोच. आजही गृहिणी पुरणपोळ्या बनविण्यास प्राधान्या देतात. तर घर आणि नोकरी अशी दुहेरी जबाबदारी पेलणाऱ्या कारभारणी रेडिमेड पुराणपोळी आणण्यास पसंती देतात. मात्र यंदाच्या पुरपोळीच्या गोडव्याला महागाईचा रंग चढला आहे. पुरणपोळी गेल्या वर्षीपेक्षा पाच रुपयांनी महागली आहे. मात्र तरीही विक्रीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे विक्रेत्यांने सांगितले.
पूर्वी होळीची चाहूल लागल्यावर घरोघरी पुरणाचे साचे घासूनपुसून ठेवले जात. मात्र आता काळ बदलल्याने रेडिमेड पुरणपोळीची ऑर्डर देण्यासाठी नोकरदार महिलांची लगबग दिसून येत आहे. सर्वच क्षेत्रात महागाई वाढल्यामुळे पुरणपोळीही त्याला अपवाद ठरलेली नाही.

धुलीवंदनासाठी पोलिसांकडून आदेश जारी मुंबई : अश्लील गाणी गाणारे, पाण्याचे फुगे फेकणाऱ्यावर आता कारवाई होणार आहे. धुलीवंदनासाठी पोलिसांकडून असे आदेश ...
यंदा पुरणपोळीची किंमत पाच रुपयांनी वाढली आहे, तरीही मागणीवर कोणताही परिणाम होत नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी दोन नग पुरणपोळीसाठी ५० रुपये मोजावे लागत होते. यंदा मात्र ६० रुपचे खर्च करावे लागत आहे. मराठी घरात होळीला पुरणपोळीचा नैवेद्य लागतो. त्याचप्रमाणे अनेक बिगर मराठी लोकही होळीच्या दिवशी पुरणपोळीचा आस्वाद घेतात. त्यामुळे मागणीत वाढ होत असल्याचे विक्रेत्याने सांगितले. अधिक टिकाऊ असलेल्या तेलपोळ्याही होळीनिमित्त हातो-हात विकल्या जातात. मात्र महागाईमुळे या वर्षी खवय्यांना एका तेलपोळीसाठी ३० रुपये मोजावे लागत आहेत.

रासायनिक रंग पोटात गेल्याने प्राण्यांच्या पचनक्रियेवर विपरीत परिणाम प्रशांत सिनकर ठाणे : होळीच्या (Holi) दिवशी जबरदस्तीने रंग फासून रंगाचा बेरंग करू ...
मजुरीमध्ये वाढ
पुरणपोळ्यांसाठी लागणाऱ्या तुपाच्या दरात वाढ झाली आहे. शिवाय पुरणपोळ्या तयार करणाऱ्या महिला दिवसावर काम करतात. आतापर्यंत २०० रुपये दिवसाला या महिला घेत होत्या. मात्र आता त्या दररोज पुरणपोळ्या बनविण्यासाठी ३०० रुपये घेतात. यामुळे दरवाढ करण्याशिवाय आमच्यापुढे पर्याय नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. सणासुदीला घरात गोडधोड पदार्थ बनविण्याची पद्धत हळूहळू कमी होत असून विकत मिळणाऱ्या घरगुती पद्धतीच्या पदार्थांकडे गृहिणींचा कल वाढला आहे.