रासायनिक रंग पोटात गेल्याने प्राण्यांच्या पचनक्रियेवर विपरीत परिणाम
प्रशांत सिनकर
ठाणे : होळीच्या (Holi) दिवशी जबरदस्तीने रंग फासून रंगाचा बेरंग करू नका, असे आवाहन केले जात असले तरी जोर जबरदस्तीने मुक्या जीवाला रंग फसले जातात. मात्र रंगामुळे मुक्याजीवांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत. रासायनिक अथवा विषारी रंग प्राण्यांच्या पोटात जाण्याची शक्यता असून, डोळ्यांवर विपरीत परिणाम होण्याचा धोका वाढतो.
रंगाने खेळताना नैसर्गिक अथवा गुलालाचे रंग उधळून रंगपंचमी साजरी करण्याचे आवाहन केलं जातं. मात्र या आवाहनाला हरताळ फासला जातो आहे. रासायनिक रंगांचे दुष्परिणाम सर्वांना ज्ञात असताना देखील अनेकजण होळीच्या (Holi) दिवशी रासायनिक रंगाचा वापर करतात. काही वेळा मजेखातर प्राणी पक्ष्यांना रंग लावण्याचे प्रकार घडतात. परंतु रंगाचे दुष्परिणाम प्राणी पक्ष्यांना भोगावे लागत असल्याची माहिती ज्येष्ठ पशुवैद्यक डॉ. युवराज कागिनकर यांनी दिली.
Police Alert : अश्लील गाणी गाणारे, पाण्याचे फुगे फेकणाऱ्यावर होणार कारवाई
प्राण्याच्या अंगावर पाणी टाकल्यावर हे पाणी पटकन जीभेने चाटून काढतात. ऑईलपेंटचा रंग कुत्रा, मांजर, ससा अशा केसाळ प्राण्यांच्या अंगावर सुकला तर त्यांचे केस निखळण्याची शक्यता अधिक असते. अंग चाटताना हे केस उपटून त्या ठिकाणी जखम होते. मुक्या प्राण्यांच्या अंगाला फसलेला रासायनिक रंग प्राण्यांच्या जीवावर उठू शकतो.
उष्मा वाढला असून रस्त्यावरचे प्राणी पक्षी मिळेल ते पाणी पितात. यामुळे रंगपंचमीच्या दिवशी काही ठिकाणी रस्त्यावर पाणी सांडते आणि हे पाणी कुत्रा, मांजर, कबुतर, चिमणी कावळा पक्षी हे पाणी पितात, मात्र रंगाचे पाणी प्यायल्याने पशुपक्ष्यांना अपायकारक ठरू शकते.